बांद्यात नवागतांचे जल्लोषी स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांद्यात नवागतांचे जल्लोषी स्वागत
बांद्यात नवागतांचे जल्लोषी स्वागत

बांद्यात नवागतांचे जल्लोषी स्वागत

sakal_logo
By

29417
बांदा ः येथील केंद्रशाळेत शिक्षणाची गुढी उभारताना मान्यवर व विद्यार्थी.

बांदा केंद्रशाळेत विद्यार्थ्यांनी उभारली शिक्षणाची गुढी

प्रवेशोत्सव उत्साहात; नवागतांचे जल्लोषी स्वागत

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील पहिला दिवस चैतन्यमय व अविस्मरणीय व्हावा, यासाठी जिल्हा परिषद बांदा क्र. १ केंद्रशाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशाची गुढी उभारून नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम राबवता आला नव्हता. यावर्षी सर्वाधिक पटसंख्या असलेल्या बांदा केंद्रशाळेत मोठ्या उत्साहाने हा दिवस पार पडला.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडलेला. यावेळी हंबीराव मोहिते यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस, ‘देवमाणूस-२’ मालिका फेम युवा अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर या कलाकरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण झाले. शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष नारायण गावडे यांच्यावतीने विद्यार्थ्यांना रोप देऊन स्वागत करण्यात आले. मोफत पाठ्यपुस्तकांचेही वाटप झाले. यावेळी अभिनेते गवस व वैष्णवी कल्याणकर यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला बांदा सरपंच अक्रम खान, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संतोष बांदेकर, ग्रामपंचायत सदस्य उमांगी मयेकर, रवींद्र पटेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी, सूत्रसंचालन उपशिक्षक जे. डी. पाटील यांनी केले. आभार मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी मानले. यावेळी संपूर्ण शाळा डिजिटल करण्यासाठी सरपंच खान यांनी स्वखर्चातून मोफत वायफाय सुविधा देण्याचे जाहीर केले. अभिनेते गवस यांनी शाळेतील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी ५ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
............
चौकट
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या
पहिली ही मुलांच्या शालेय जीवनाची सुरुवात आहे. मुलांच्या कलानुसार पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे. विविध उपक्रमात सहभागी घेण्यासाठी प्रवृत्त करावे. तरच आजची मुले उद्याची यशस्वी पिढी निर्माण होऊ शकेल असे प्रतिपादन अभिनेते अनिल गवस यांनी केले. ग्रामीण भागातील मुले स्पर्धा परीक्षांमध्ये मागे राहत असल्याने शाळा पातळीवरच यासाठी शिक्षक व पालकांनी मुलांची तयारी करून घ्यावी, असे आवाहन वैष्णवी कल्याणकर हिने केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68154 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top