
राजापूर-महिलांना केले वडाच्या रोपांचे वाटप
-rat15p2.jpg
29580
ः राजापूर ः वटपौर्णिमेनिमित्त सुवासिनीला वडाच्या झाडाचे रोप देताना डाटा ऑपरेटर संचिता पंगेरकर.
--------
महिलांना केले वडाच्या रोपांचे वाटप
अणसुरे ग्रामपंचायतीने राबवला उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः वटपौर्णिमेनिमित्ताने पूजा करून सात फेरे घालण्यासाठी सध्याच्या धावपळीच्या जीवनासह विविध कारणांमुळे वडाच्या ठिकाणी जाणे सुवासिनींना शक्य होत नाही. त्यातून, वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून त्याची पूजा केली जाते. मात्र, याच वडाच्या झाडच्या फांद्या न तोडता त्याची लागवड होऊन पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन व्हावे, या दृष्टीने अणसुरे ग्रामपंचायतीने वडाच्या रोपांचे सुवासिनींना वाटप करून अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरा केली. ग्रामपंचायतीमार्फत उभारण्यात आलेल्या रोपवाटिकेतील वडाच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत यांनी दिली. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणारे विविध उपक्रम राबवणाऱ्या अणसुरे ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानंतर्गंत कोकण विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. वडाच्या झाडाच्या फांद्या तोडण्याऐवजी त्याच्या रोपांची लागवड केल्यास त्याचा पर्यावरण जतन आणि संवर्धनाच्यादृष्टीने अधिक फायदा होणार आहे. त्यादृष्टीने अणसुरे ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबवला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68171 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..