राजापूर-राजापुरात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मिरवणूका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापुरात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मिरवणूका
राजापूर-राजापुरात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मिरवणूका

राजापूर-राजापुरात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मिरवणूका

sakal_logo
By

-rat15p40.jpg
29354
ः राजापूर ः शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन घोषणा देताना मुले.
--------------
राजापुरात मिरवणुकीने विद्यार्थ्यांचे स्वागत

ढोल-ताशांचा गजर; विद्यार्थी, शिक्षक आनंदी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १५ ः कोरोना महामारीनंतर आजपासून शाळा सुरू झाल्या असून मोठ्या संख्येने मुलांनी आज ता. १५ रोजी शाळेमध्ये प्रवेश केला. मुलांच्या किलबिलाटाने शाळांचा परिसर गजबजू लागला आहे. ढोलताशाच्या गजरामध्ये पालकांसह शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये जोरदारपणे स्वागत केले. विश्‍वनाथ विद्यालयामध्ये ढोल-ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढत मुलांचे पालक, शिक्षक यांच्याकडून स्वागत करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने ''शिक्षणाची पालखी''ची मिरवणूक काढत साऱ्‍यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. या मिरवणुकीमध्ये माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर खडपे, उपाध्यक्ष अ‍ॅड. रोझीना खोपेकर, माजी नगरसेवक गोविंद चव्हाण, संदीप पुजारी यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक, शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68197 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top