चिपळूण : कुंभार्ली घाटातील अपघात प्रकरणी भिसेवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण :  कुंभार्ली घाटातील अपघात प्रकरणी भिसेवर गुन्हा
चिपळूण : कुंभार्ली घाटातील अपघात प्रकरणी भिसेवर गुन्हा

चिपळूण : कुंभार्ली घाटातील अपघात प्रकरणी भिसेवर गुन्हा

sakal_logo
By

कुंभार्ली घाटातील अपघातप्रकरणी भिसेवर गुन्हा

चिपळूण, ता. १५ ः कुंभार्ली घाटातील अपघातप्रकरणी मृत अभियंता शंकर दिनकर भिसे (वय ५६) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शिरगाव पोलिसांनी या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. अभियंता शंकर भिसे व सहप्रवासी अश्विनी दिग्विजय रासकर (रा. मंगळवार पेठ, सातारा) हे कराडहून चिपळूणकडे येत होते. ते पोफळी येथे आले असता, भिसे यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बैठक असल्याचा फोन आला. म्हणून ते परत पोफळीहून कराडच्या दिशेने कुंभार्ली घाटातून निघाले. कराडकडे जात असताना गाडी घाटामध्ये अतीवेगाने चालवल्यामुळे गाडीवरील त्यांचा ताबा सुटला आणि एका वळणावर गाडी दरीत जाऊन कोसळली. यामध्ये सहप्रवासी महिला जखमी झाली असून त्यांनी शिरगाव पोलिसात खबर दिली. त्यानुसार मृत भिसे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68209 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top