देवगडात शाळा गजबजल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडात शाळा गजबजल्या
देवगडात शाळा गजबजल्या

देवगडात शाळा गजबजल्या

sakal_logo
By

29473
देवगड ः येथे शाळेत जाणारी विद्यार्थिनी.

देवगड तालुक्यातील
शाळा पुन्हा गजबजल्या

देवगड, ता. १५ ः उन्हाळी सुटीच्या दीर्घ विश्रांतीनंतर तालुक्यातील शाळा आज गजबजल्या. नवीन वर्ग, नवीन पुस्तके अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे शाळा, माध्यमिक शाळांच्या संस्था पदाधिकाऱ्यांकडून उत्साही स्वागत झाले. पाऊस नसल्याने विद्यार्थी, पालकांच्या दृष्टीने सोयीचे झाले होते.
२०२२-२३ च्या शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ झाला. गेली सुमारे दोन वर्षे कोरोनामुळे शाळा अनियमित होत्या. त्यामुळे मुलांनाही नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचा आनंद घेता आला नव्हता. कोरोनाचे भय असल्याने पालकही आपल्या पाल्यांच्या बाबतीत सावधानता बाळगून होते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची एकूणच उपस्थिती पाहता शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले होते; मात्र यंदा शैक्षणिक वर्षाची सुरुवात दमदार झाली. उन्हाळी सुटीनंतर शाळा आजपासून सुरू झाल्याने सकाळपासूनच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची लगबग दिसत होती. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती नवीन शैक्षणिक वर्षाची पुस्तके पडली. शिक्षक, शाळांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा आजपासून सुरू झाल्याने पालकांची लगबग वाढली होती. दुपारी शाळा सुटल्यावर पालकांची शाळांच्या प्रवेशद्वारासमोर गर्दी झाली होती. पाचवीत माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचा उत्साह मोठा होता. नवीन शाळा परिसर, नवीन वर्ग, नवीन बैठक व्यवस्था, नवीन सवंगडी अशा वातावरणात आज विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला होता. प्राथमिक शाळांमध्येही विद्यार्थ्यांचे शिक्षकांकडून स्वागत झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68211 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top