रत्नागिरी-प्रसिद्ध मारुती मंदिराचे स्थलांतर नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-प्रसिद्ध मारुती मंदिराचे स्थलांतर नाही
रत्नागिरी-प्रसिद्ध मारुती मंदिराचे स्थलांतर नाही

रत्नागिरी-प्रसिद्ध मारुती मंदिराचे स्थलांतर नाही

sakal_logo
By

-rat15p50.jpg
L29475
- शहरातील प्रसिद्ध मारुती मंदिराच्या स्थलांतराबाबत उलटसुलट असलेल्या चर्चांना मुख्याधिकाऱ्यांनी पूर्णविराम दिला.
---------
प्रसिद्ध मारुती मंदिराचे स्थलांतर नाही

मुख्याधिकारी बाबर; सोशल मीडियावरील चर्चा निराधार, ट्रस्टला कोणतीही नोटीस नाही
रत्नागिरी, ता. १५ ः मारुतीचे मंदिर स्थलांतरित करा, असे कोणतेही नोटीस ट्रस्टला पालिकेने बजावलेले नाही. टीपी प्लॅनमध्ये हे फक्त आयलॅंड दाखवले आहे. ट्रॅफिक आयलॅंड नाही. त्यामुळे मंदिर स्थलांतरित होण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्टीकरण पालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिले. त्यामुळे शहराचा मान आणि शान असलेल्या मारुती मंदिर सर्कलमधील मारुती मंदिरची धार्मिकता कायम राहणार आहे. हे मारुती मंदिर स्थलांतरित करावे लागण्याची भीती व्यक्त केली जात होती. याबाबत अनेकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत होत्या. पालिकेने खुलासा केल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.
शहरातील हे मंदिर स्थलांतरित करण्याबाबत पालिकेने मंदिराच्या ट्रस्टींना नोटीस बजावल्याच्या चर्चेवरून हे गुऱ्हाळ सुरू झाले. रत्नागिरी शहराची जी हद्द दाखवली आहे. मारुती मंदिर ही रत्नागिरीच्या या सर्कलला नाव देणारे वेशीवरील मंदिर स्थलांतरित करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यामुळे शेकडो भाविकांची घोर निराशा झाली होती.
२०१७ मध्ये शहराची नगररचना योजनेंतर्गत या मारुती मंदिर येथील ट्रॅफिक लँड करण्याची योजना शासनाने कार्यान्वित केली. त्यासाठी २०१४-१५ ला हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या, त्याकडेही दुर्लक्ष केल्याचे समजते. शासनाने २०१६ ला या नगररचना योजनेला मान्यता दिली. त्यामुळे आता मारुती मंदिर येथील मारुतीचे देऊळ स्थलांतरित करण्याच्या सूचना नगर पालिकेने संबंधित मंडळाला दिल्या आहेत.
...
चौकट
स्थलांतराचा विषयच येत नाही..
वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याशी चर्चा केली असता, ते म्हणाले, शहरातील मारुती मंदिर येथील मंदिर स्थलांतरित करण्यात यावे, याबाबत कोणतीही नोटीस आम्ही ट्रस्टींना दिलेली नाही; मात्र ट्रस्टींनी आम्हाला पत्र दिले होते की, आम्हाला जागा उपलब्ध झाल्याशिवाय स्थलांतर करण्यात येऊ नये; मात्र ट्रस्टीने हे पत्र का दिले आणि कोणत्या माहितीच्या आधारे दिले, याची कल्पना नाही. याचा सातबारा पालिकेच्या नावे आहे; परंतु पालिकेने स्थलांतराबाबत कोणतेही नोटीस दिलेले नाही. त्यामुळे मारुती मंदिर स्थलांतराचा विषयच येत नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68218 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top