रत्नागिरी- हक्काचा खासदार हवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- हक्काचा खासदार हवा
रत्नागिरी- हक्काचा खासदार हवा

रत्नागिरी- हक्काचा खासदार हवा

sakal_logo
By

फोटो काल सोडला
...
-rat15p52.jpg
29484
- रत्नागिरी : भाजपच्या गरीब कल्याण संमेलनात बोलताना जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन. सोबत मान्यवर. (छाया- प्रसाद जोशी)
----------
भाजपचा हक्काचा खासदार निवडून द्या

गरीब कल्याण संमेलनात भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. पटवर्धनांचे आवाहन
रत्नागिरी, ता. १५ : जननायक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समर्थ भारत घडतो आहे. परंतु या लोककल्याण योजना जिल्ह्यात पोहोचवण्यासाठी आपला हक्काचा खासदार नाही, हे शल्य आहे. हे शल्य मिटवून टाकण्यासाठी कार्यकर्त्यांनी मानसिकता तयार करण्याची गरज आहे. आपला खासदार कमळ चिन्हावर निवडून आला पाहिजे, याकरिता मनोवृत्ती तयार करा, असे सांगत भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. येथे आयोजित गरीब कल्याण संमेलनात ते बोलत होते.
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात आज सायंकाळी झालेल्या संमेलनास पाचशेहून अधिक भाजप कार्यकर्ते, केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी उपस्थित होते. अॅड. पटवर्धन म्हणाले, आगामी काळात नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत. केंद्रातील भाजपा शासनाच्या असंख्य लोककल्याणकारी योजना आपण जिल्ह्यात पोहोचवून लाभार्थ्यांच्या मनात बिंबवल्या पाहिजेत. यातूनच जिल्हा परिषद, पंचायत समिती भाजपची असेल, याची खात्री बाळगा.
मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी ६२ कोटीची नळपाणी योजना दिली. पण अजूनही ती सुरू करणे सत्ताधाऱ्यांना जमले नाही. पालकमंत्र्यांनी बेकायदा हॉटेल बांधले. हॉटेल पाडण्याचे आदेश दिले आहेत. परंतु पालकमंत्र्यांना त्याची लाज वाटत नाही. रत्नागिरीच्या जनतेला बसस्थानकाची गरज आहे. तुमच्याकडे पैसे नसतील, आम्ही भीक मागून पैसे गोळा करून देतो, अशी टोकाची भूमिका आम्हाला घ्यावी लागली.
ते म्हणाले, हे भाजपचे १०६ आमदार बाजूला सारून कुटील कारस्थान करून सत्तेचे राजकारण करत महाविकास आघाडी स्थापन केली. परंतु हे दळभद्री सरकार असून फक्त गादी उबवणारे शासन आहे. यांचे मंत्री तुरुंगाची हवा खात आहेत. या वेळी अॅड. बाबा परुळेकर, ऐश्वर्या जठार, देवरूख नगराध्यक्ष मृणाल शेट्ये, सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, मुन्ना खामकार, सचिन करमकर, उमेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.
-----------
चौकट 1
विधानपरिषदेच्या पाचही जागा जिंकणार
बहुमत नसताना राज्य सभेसाच्या जागा जिंकून भाजपाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे वस्त्रहरण केले. येत्या २० जूनला होणाऱ्या भाजप विधान परिषदेच्या पाचही जागा जिंकणार असल्याचा दावा अॅड. पटवर्धन यांनी या वेळी केला. आपले आमदार प्रसाद लाड हेसुद्धा पुन्हा आमदार होतील, असा विश्वास व्यक्त केला.
..
चौकट
राज्य सरकार विकलांग
कोविडच्या काळात रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे परस्पर विरोधी निर्णय, हॉस्पिटलची वाईट स्थिती आपण पाहिली. हे राज्य सरकार विकलांग आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबद्दलही राज्य सरकारवर त्यांनी टीका केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68236 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top