चौकुळमधील व्यक्तीचा सातार्डा पुलाखाली मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चौकुळमधील व्यक्तीचा सातार्डा पुलाखाली मृतदेह
चौकुळमधील व्यक्तीचा सातार्डा पुलाखाली मृतदेह

चौकुळमधील व्यक्तीचा सातार्डा पुलाखाली मृतदेह

sakal_logo
By

चौकुळमधील व्यक्तीचा
सातार्डा पुलाखाली मृतदेह

सावंतवाडी, ता. १५ ः पेडणे-न्हयबाग येथील सातार्डा पुलाखाली चौकुळ येथील एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. काल सकाळी अकराच्या सुमारास ही घटना समोर आली. अनिल विठ्ठल गावडे, असे त्यांचे नाव आहे. त्याच्याकडे असलेल्या ग्रंथालयातील पुस्तकाच्या माध्यमातून त्यांची ओळख पटली. त्यानुसार पेडणे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पेडणे पोलिस उपनिरीक्षक विवेक हळणकर यांनी ही माहिती दिली.
गावडे हे पडणे येथे कामाला होते. काल (ता. १४) सकाळी अकराच्या सुमारास पेडणे-न्हयबाग येथील सातार्डा पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. ही बाब तेथील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी पेडणे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी गावडे यांच्याजवळ एक ग्रंथालयातील पुस्तक आढळून आले. यावर सावंतवाडी-चौकुळ येथील एका ग्रंथालयाचे नाव व गाव चौकुळ असे लिहिलेले होते. त्यानुसार पेडणे पोलिसांनी आंबोली दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांच्याशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली. चौकुळ पोलिसपाटलांना फोटो पाठवून खात्री केली असता संबंधित व्यक्ती चौकुळ येथील असल्याची ओळख पटली. त्यांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर निष्पन्न झाले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68240 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top