
श्री रवळनाथ सोसायटीच्या कुडाळ शाखाध्यक्षपदी येजरे
swt163.jpg
29607
अशोक येजरे
श्री रवळनाथ सोसायटीच्या
कुडाळ शाखाध्यक्षपदी येजरे
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १६ ः श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी लि., आजरा (मल्टी-स्टेट) या संस्थेच्या कुडाळ शाखेच्या चेअरमनपदी श्री. अशोक येजरे यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.
यापूर्वी प्राचार्य डॉ. सिध्देश्वर डिसले हे कुडाळ शाखा चेअरमन म्हणून काम पहात होते. त्यांची पेठ वडगांव (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांनी शाखा चेअरमन पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या पदावर नियुक्तीबाबत प्रधान कार्यालय संचालक मंडळ मिटींगमध्ये चर्चा होऊन श्री. येजरे यांची कुडाळ शाखा चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली.
श्री. येजरे हे बॅ. नाथ पै. विद्यालय कुडाळचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. यापूर्वी रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कुडाळ शाखेचे शाखा सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. त्याचप्रमाणे उत्तुर (ता. आजरा) येथील सदाफुली ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक संचालक असून, कुडाळ तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक अध्यापक सहकारी पतसंस्था कुडाळ येथे उपाध्यक्ष, कुडाळ तालुका माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कुडाळचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी अतिशय उत्तम काम केले आहे. सहकार चळवळीतील त्यांचे योगदान विचारात घेऊन त्यांची कुडाळ शाखा चेअरमन म्हणून संस्थेने नियुक्ती केली आहे, असेही श्री. चौगुले यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68404 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..