कणकवली रूग्णालय व्हेंटिलेटरवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली रूग्णालय व्हेंटिलेटरवर
कणकवली रूग्णालय व्हेंटिलेटरवर

कणकवली रूग्णालय व्हेंटिलेटरवर

sakal_logo
By

swt१६९.jpg
२९६१३
कणकवली उपजिल्हा रुग्णालय

कणकवली रूग्णालय व्हेंटिलेटरवर
रिक्ते पदेः कारभार चाललाय रामभरोसे
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १६ः कोरोनाच्या चौथ्या लाटेबरोबरच तापसरीच्या साथीने डोके वर काढले असताना कणकवली उपजिल्हा रुग्णालय मात्र वैद्यकीय तज्ञ आणि वैद्यकीय तंत्रज्ञ तसेच कर्मचाऱ्यांअभावी व्हेंटिलेटरवर आहे. गेले सहा महिने वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त असल्याने उपजिल्हा रुग्णालयात कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. त्यामुळे रुग्णांना खाजगी दवाखान्यावर रूग्णांना अवलंबून राहावे लागण्याची वेळ आली आहे.
कणकवली, देवगड, मालवण, वैभववाडी आणि कुडाळ या तालुक्यांना मध्यवर्ती असलेले उपजिल्हा रुग्णालय येथे आहे. जवळपास शंभर खाटांची सुविधा असलेल्या या रुग्णालयांमध्ये अद्ययावत सुविधा आहेत. सोनोग्राफी, डायलसिस, ट्रामा केअर युनिट, ऑक्सिजन प्लान्ट अशा सुविधा आहेत; परंतु या सुविधांसाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्यांवरच उपचार घेण्याची वेळ येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळा सुरू झाल्यानंतर अपघातांची मालिका सुरू आहे; मात्र येथे प्रभावीपणे उपचार करण्यासाठी वैद्यकीय तज्ञ उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा अधिक उपचाराचीसाठी गोवा मेडिकल कॉलेजवरच अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. कोरोना कालावधीमध्ये कोट्यावधी रुपयांची उधळण झाली. तरीही आरोग्य विभागाची रिक्त पदे राज्य शासनाकडून भरण्यात झालेली नाहीत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात आजारी अवस्थेत आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांवर येथे तातडीने उपचार केले जातात; पण अधिक उपचारासाठी येथे वैद्यकिय तज्ञ नसल्याने गरीब रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची अवस्था बिकट होत आहे.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी तांत्रिक संवर्गातील एकूण ९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ६९ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत तर २६ पदे रिक्त आहेत. यापदांमध्ये पुरेसे वैद्यकीय तज्ञ येथे उपलब्ध नसल्याने उपचार कोण करणार अशी स्थिती आहे. सध्या स्थितीमध्ये वैद्यकीय अधीक्षक पद, नेत्र तज्ञ गट, भूलतज्ञ गट दोन पदे आणि वैद्यकीय अधिकारी अपघात विभाग एक पद रिक्त आहे. गट ब मध्ये १३ वैद्यकीय पदे मंजूर असून ७ वैद्यकीय तज्ञ सध्या कार्यरत आहेत; मात्र एकूण उपजिल्हा रुग्णालयातील व्यापती पाहता आणि येथील नियमित तपासाणीसाठी येणाऱ्या ३०० रूग्णांची संख्या लक्षात घेता वैद्यकीय तज्ज्ञांची आवश्यकता आहे. या रुग्णालयासाठी मंजूर असलेले दंत शल्यचिकित्सक आणि प्रशासकीय अधिकारी ही दोन्ही पदे रिक्त आहेत. क गटातील वैद्यकीय अधिकारी १ पद, कार्यालयीन अधिक्षक सहाय्यक अधीक्षक वर्ग-३ वरिष्ठ लिपिक प्रत्येकी एक आणि कनिष्ठ लिपिक वर्ग तीन मधील चार पैकी तीन पदे रिक्त आहेत. तांत्रिक उपकरणे या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आहे; मात्र प्रयोगशाळा तंत्रज्ञ वर्ग-३ आणि प्रयोगशाळा सहाय्यक वर्गतील ही दोन्ही पदे रिक्त आहेत. औषध निर्माण अधिकारी वर्ग ३ ची २ पदे रिक्त आहेत.
-------------
कोट
जिल्ह्यातील वैद्यकीय तज्ञ आणि इतर आवश्यक असलेली रिक्त पदे टप्प्या टप्पाने लवकरच भरली जातीत. शासन पातळीवर तशी प्रक्रीया सुरू झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने नव्याने भरती प्रक्रीया सुरू केली आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्य़ा कालावधीत अनेक अडचणी आल्या. तरीही राज्य सरकारने नव्याने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालय आणि जिल्हा रूग्णालयातील रिक्तपदे लवकरच भरण्याची प्रक्रीया सुरू केली आहे.
- उदय सामंत, पालकमंत्री
------------------
चौकट
गट-मंजूरपदे-रिक्त
अ-१३-६
ब-२-२
क-५७-१०
ड-२३-८
----------
एकूण९५-२६
-------------
युनिट-मंजूर पदे-रिक्त
ट्रामा केअर युनिट-९-५
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68406 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top