चिपळूण ः शिवनदीत पुन्हा धावू लागल्या बोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः शिवनदीत पुन्हा धावू लागल्या बोटी
चिपळूण ः शिवनदीत पुन्हा धावू लागल्या बोटी

चिपळूण ः शिवनदीत पुन्हा धावू लागल्या बोटी

sakal_logo
By

-rat16p26.jpg
29597
ः चिपळूण ः गोवळकोट येथील तरुणांनी शिव नदीमध्ये बोट चालण्याचा यशस्वी प्रयोग केला.
..
खालील फोटो मोठा वापरा
-rat16p29.jpg
L29617
ः गाळ काढल्यामुळे शिवनदीचे रुंदावलेले पात्र.
---------
स्वच्छतेची मोट; नदीत धावू लागली बोट

शिवनदीने गाळ उपशामुळे घेतला मोकळा श्वास; पात्रही रुंदावले, बोटी चालवण्याची रंगीत तालीम
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः शिवनदीतील गाळ काढल्यानंतर नदीपात्रात पुन्हा एकदा बोटी धावू लागल्या आहेत. यातून शिवनदीचे पात्र खोल झाल्याचा समाधान नागरिकांना मिळाला आहे. पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी शिवनदी सज्ज झाल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. आपत्तीकाळात बोटी चालवण्याची रंगीत तालीम आज शिवनदीत घेण्यात आली.
चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिवनदीचे पात्र गाळाने भरले होते. त्यामुळे मुसळधार पावसात नदीचे पाणी शहरांमध्ये घुसून पूरपरिस्थिती निर्माण होत होती. शासनाने वाशिष्ठी नदीतील गाळ करण्यासाठी निधीची तरतूद केली. त्याचप्रमाणे पालिकेनेही नदीतील गाळ करण्यासाठी निधीची तरतूद केली. नाम फाउंडेशन आणि चिपळूणमधील स्वयंसेवी संस्थांनी गाळ काढण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी मदत केली. त्यामुळे मागील चार महिने वाशिष्ठी आणि शिवनदी स्वच्छ करण्याचे काम सुरू होते. शहरातील खाटिक आळी येथे वाशिष्ठी नदीला शिवनदी मिळते.
....
चौकट
स्वयंसेवी कार्यकर्त्यांचा प्रयोग..
शिवनदीच्या मुखापासून गाळ काढण्याचे काम सुरू झाले होते. शहरातील बाजारपुलापर्यंत गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले. गाळ काढण्याबरोबरच नदीचे पात्र रुंद आणि खोल करण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात आता पाणी खेळते वाहत आहे. नदीपात्रात मुबलक पाणी असल्यामुळे या पाण्यातून फायबर बोट चालवण्याचा प्रयोग आपत्तीच्या काळात पालिकेला सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी केला. यामध्ये गोवळकोट येथील जफर कटमाले, अस्गर नाखुदा, जमीर सुर्वे, समीर पटेल, नवाब कटमाले महेंद्र कासेकर यांनी सहभाग घेतला.
-----------
चौकट
गाळ काढण्यासाठी उठाव
सन २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याचे काम पालिकेने सुरू केले. दरवर्षी नदीपात्रातील गाळ काढून किनाऱ्यावर ठेवला जात होता. त्यामुळे पावसाळ्यात किनाऱ्यावरील गाळ पुन्हा नदीपात्रात येऊन नदीत गाळ साचत होते. फार वर्षांपूर्वी शिवनदीचे पात्र खोल होते. नदीपात्रात बोटी फिरतील, इतके समाधानकारक पाणी होते; परंतु मागील काही वर्षे नदीतील गाळ साचण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आणि नदीकिनारी भागात झाडेझुडपे वाढल्यामुळे या नदीतून बोटीने प्रवास करणे हे धोक्याचे झाले होते. जुलै २०२१ मध्ये चिपळूण शहरात महाप्रलयंकारी आला. त्यानंतर शिवनदीतील गाळ काढण्यासाठी नागरिकांमधून उठाव झाला.
...
कोट फोटो येत आहेत
..
कोट
शिव आणि वाशिष्ठी नदीत पूर्वी व्यावसायिक बोटी चालायच्या. व्यापाऱ्यांचे साहित्य बोटीतून चिपळूणला आणले जायचे. दोन्ही नदीचे पातळी गाळाने भरल्यानंतर व्यापारी वाहतूक बंद झाली. शहरात पूर येऊ नये, म्हणून पालिकेने नदीतील गाळ उपसला. त्यामुळे आता नदीपात्रात मुबलक पाणी आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात बोटीने ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठीचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्याची रंगीत तालीम आज आम्ही शिवनदीत केली. शिवनदीचे पात्र मोकळे आणि खोल झाल्याचे समाधान आहे.
-जफर कटमाले, गोवळकोट
-----------
कोट
शिवनदीचे पात्र आता खोल आणि रुंद झाले आहे. पूरपरिस्थितीमध्ये त्याचा फायदा नक्की होईल. त्याशिवाय भविष्यात नदीपात्रात पर्यटनाच्यादृष्टीने बोटी चालवणे शक्य आहे. यातून चिपळूणचे पर्यटनवाढीसाठी वाव आहे.
- नवाब कटमाले

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68420 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top