पान दोन मेन-सांडपाण्यासह मैला कोळंब खाडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान दोन मेन-सांडपाण्यासह मैला कोळंब खाडीत
पान दोन मेन-सांडपाण्यासह मैला कोळंब खाडीत

पान दोन मेन-सांडपाण्यासह मैला कोळंब खाडीत

sakal_logo
By

L29672

ओळ - मालवण ः शहरातील कचऱ्याच्या समस्येसह मैला कोळंब खाडीत टाकण्यात येत असल्याने संतप्त काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रसाद भुते यांना धारेवर धरले.

सांडपाण्यासह मैला कोळंब खाडीत
काँग्रेसचा आरोप ः मालवण पालिकेकडे मागितला खुलासा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १६ : शहरातील कॉम्प्लेक्समधील सांडपाणी, कचरा आदी समस्यांसह शहरातील शौचालयांमधील मैला पालिका कर्मचाऱ्यांकडून कोळंब खाडीत टाकण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याप्रश्नी त्यांनी पालिकेत धडक देत आरोग्य निरीक्षकांना धारेवर धरत जाब विचारला. मुख्याधिकाऱ्यांनी याचा खुलासा करावा अन्यथा आंदोलन छेडले जाईल तसेच याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधू, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
शहरातील कॉम्प्लेक्स, अन्य शौचालयांमधील मैला पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कोळंब येथील खाडीत सोडण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे संतप्त बनलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याचा जाब विचारण्यासाठी पालिकेत धडक दिली. यावेळी काँग्रेसचे महेश अंधारी, श्रीकृष्ण तळवडेकर, जेम्स फर्नांडिस, संदेश कोयंडे, पल्लवी तारी, बाबा मेंडीस, लक्ष्मीकांत परुळेकर, गणेश पाडगावकर आदी उपस्थित होते. पालिकेत मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने आरोग्य निरीक्षक प्रसाद भुते यांना याचा जाब विचारत धारेवर धरले. यावेळी मैला कोळंबच्या खाडीत टाकण्यात येत असल्याची कबुली त्यांनी दिली. यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकारामुळे आरोग्य विषयक समस्या उद्भवल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला. शहरातील काही कॉम्प्लेक्स मधील सांडपाणी हे उघड्यावर सोडले जात आहे. यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्यास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे कॉम्प्लेक्सची पाहणी देखील अधिकाऱ्यांनी करावी. शहरातील स्वच्छता व आरोग्य विषयक प्रश्न सोडविण्यास मुख्याधिकारी सक्षम नाहीत. स्वच्छ मालवण सुंदर मालवण असे फलक केवळ नावापुरते लावले आहेत. प्रत्यक्षात तशी कोणतीही कार्यवाही पालिका प्रशासनाकडून होत नाही, असे आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकारी महेश अंधारी, संदेश कोयंडे यांनी केले.
........
...तर आंदोलन

या प्रकारामुळे आरोग्य विषयक समस्या उद्भवल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला.मैला खाडीत टाकण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी खुलासा करावा, अशी मागणी यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली. हे प्रश्न न सुटल्यास काँग्रेसला आंदोलन करावे लागेल, असा इशारा देत याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार आहोत, असे यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68470 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top