रत्नागिरी- पालीत नवा एसटी स्टॅंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- पालीत नवा एसटी स्टॅंड
रत्नागिरी- पालीत नवा एसटी स्टॅंड

रत्नागिरी- पालीत नवा एसटी स्टॅंड

sakal_logo
By

rat16p28.jpg
L29719
रत्नागिरी ः पाली येथे बस स्थानकाच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी मंत्री उदय सामंत यांच्यासमवेत एसटीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, राजेंद्र महाडिक आदी.
--------------
पाली बसस्थानकाची होणार पुनर्बांधणी

मंत्री सामंतांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन; तीन कोटी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ ः महाराष्ट्र शासनाच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत एसटीच्या पाली बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी तीन कोटी २१ लाख रुपये मंजूर करण्यात आहेत. या कामाचे भूमिपूजन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
या वेळी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, यंत्र अभियंता जगताप, विभाग वाहतूक अधिकारी मेहत्तर, लांजा आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांच्यासमवेत माजी जि. प. सदस्य बाबू म्हाप, परशुराम कदम, गजानन पाटील, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक, प्रांताधिकारी सूर्यवंशी उपस्थित होते. या योजनेसाठी पालकमंत्री अनिल परब यांनी तातडीने मंजुरी दिली. मंत्री उदय सामंत, रा. प. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तुत योजना अंमलात येत आहे. नव्या बसस्थानकात विविध सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
..
चौकट
बसस्थानकात या असतील सुविधा..
६ फलाट, प्रवासी विश्रांतीगृह
पार्सल सुविधा, पाण्याची टाकी
वाणिज्य आस्थापना, सीसीटीव्ही सुविधा
आरक्षण कक्ष, विद्यार्थी पास सुविधा
वाहतूक नियंत्रक कक्ष, उपहारगृह
हिरकणी कक्ष, प्रसाधनगृह,
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
दुचाकी व चारचाकी वाहनतळ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68491 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top