
चिपळूण ः आपत्तीपूर्वीच एनडीआरएफच्या तुकड्या दाखल होणार
लोगो - महापुराला सामोरे जाताना
---
rat16p30.jpg
29624
ः शेखर निकम
---------------
29725ः संग्रहीत
...
एनडीआरएफच्या तुकड्या दाखल होणार
आमदार निकम यांची माहिती; कमीत कमी हानी हेच उद्दिष्ट, आपत्तीत शून्य मृत्यूदर हे शासनाचे ध्येय
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः नैसर्गिक आपत्तीच्या काळात कमीत कमी हानी होईल, हे उद्दिष्ट्य ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. तशा सूचना मान्सूनपूर्व बैठकीत देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढतो. ऐनवेळी मदत व बचावकार्य करताना अडथळे येऊ नयेत, म्हणून पुढील काही दिवसांत एनडीआरएफच्या तुकड्या जिल्ह्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली.
हवामान विभागाने या वर्षी शंभर टक्केपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. ही कृषी व अन्य क्षेत्रासाठी सुखावणारी बाब आहे. असे असले तरी कमी कालावधीत जास्त पाऊस पडणे, ढगफुटीसदृश्य पाऊस पडणे, धरणक्षेत्रात अतिवृष्टी यामुळे पूरस्थिती निर्माण होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी किंवा संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे. शासकीय यंत्रणेने तयार केलेल्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचा आढावा घेतला आहे. तालुका व ग्रामस्तरावर बैठका सुरू आहेत. संबंधित विभागाने केलेली तयारी पाहता संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर निश्चितपणे मात करता येईल. २०२१ मध्ये झालेल्या महापुराचा फार मोठा अनुभव प्रशासनाच्या गाठीशी आहे. महापूर आला, तेव्हा यंत्रणा बेसावध होती. इतकी मोठी हानी होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. त्याही परिस्थितीत शासकीय यंत्रणेने महापुरावर मात केली, हाच विश्वास बाळगून प्रशासन संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे.
...
चौकट
२४ तास नियंत्रण कक्ष स्थापन
नैसर्गिक आपत्तीच्या काळात कमीत कमी हानी होईल हे उद्दिष्ट्य ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. तशा सूचना मान्सूनपूर्व बैठकीत देण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीबाबत त्वरित माहिती मिळण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालय सुरू करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन केलेले आहेत. गावपातळीवरही ही यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे.
---------------
चौकट
पूर येऊच नये, हीच प्रार्थना
पूर आल्यानंतर होणारे नुकसान न भरून येणारे आहे. त्यामुळे पूर येऊच नये, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तरीही निसर्गापुढे काहीच करता येत नसल्यामुळे मात्र पूर आला तरी कमीत कमी नुकसान झाले पाहिजे. आपत्ती कालावधीत शून्य मृत्यूदर हे शासनाचे ध्येय आहे. तालुक्यातील सर्व यंत्रणांमध्ये योग्य तो समन्वय राहावा, यासाठी आपत्ती प्रतिसाद यंत्रणा ही लागू करण्यात आली आहे. अचानक येणारा पूर आणि दरडी कोसळण्याआधी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली पाहिजे, या दृष्टीने तयारी असली पाहिजे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. आपत्तीचा सामना करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जिल्हा प्रशासनाकडून पुरवठा झाल्याचे आमदार निकम यांनी सांगितले.
-----------
चौकट
परवानगीशिवाय कुणीही मुख्यालय सोडू नये
कोळकेवाडीसह इतर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी व्यवस्थित नियोजन केले तर नागरिक अलर्ट होऊ शकतात. त्यामुळे जलसंपदाचे अधिकारी असो किंवा इतर खात्याचे अधिकारी व कर्मचारी, कुणीही आपत्तीच्या काळात कोणत्याही परिस्थितीत नेमणूकीच्या ठिकाणी राहावे. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय अजिबात सोडू नये, असे निर्देश आम्ही दिले आहेत. कुणीही बेफिकीरी दाखवली तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आमदार निकम यांनी सांगितले.
----------
चौकट
दरडग्रस्तांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रय़त्न
दरडी कोसळण्याची भीती असलेल्या काही गावांचा सर्व्हे सुरू आहे. या गावांतील काही घरे व वाड्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी शासन धोरण ठरवत आहे. त्यात माझ्या मतदार संघातील कुटुंबांचे चांगल्या ठिकाणी पुनर्वसन व्हावे. त्यांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68492 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..