वैभववाडीत एसटी कर्मचाऱ्यां विरोधात मासळी विक्रेत्या आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैभववाडीत एसटी कर्मचाऱ्यां विरोधात मासळी विक्रेत्या आक्रमक
वैभववाडीत एसटी कर्मचाऱ्यां विरोधात मासळी विक्रेत्या आक्रमक

वैभववाडीत एसटी कर्मचाऱ्यां विरोधात मासळी विक्रेत्या आक्रमक

sakal_logo
By

swt1630.jpg
29748
वैभववाडीः वाहतुक नियंत्रक संजय भोवड यांना घेराओ घातल्यानंतर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अमित यादव, नासीर काझी, हुसेन लांजेकर आदी.

वैभववाडीत मासळी विक्रेत्या आक्रमक
एसटी कर्मचाऱ्यांविरोधात संताप; वाहतुक नियत्रंकांना घातला घेराओ
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १६ः मासळी घेऊन एसटीतून गावागावात विक्रीसाठी जाणाऱ्या महिला विक्रेत्यांना एसटी कर्मचारी विरोध करीत असल्याच्या निषेधार्थ आज सकाळी सतंप्त झालेल्या महिलांनी वाहतुक नियंत्रक संजय भोवड यांना घेराओ घातला. पदाधिकारी आणि काही वाहक-चालकांमध्ये चर्चेदरम्यान जोरदार खडाजंगी झाली. पोलीस निरीक्षकांनी मध्यस्थी करीत यशस्वी तोडगा काढला. त्यानंतर या वादावर पडदा पडला.
तालुक्यात उंबर्डे, कोळपे येथील अनेक महिला सुकी आणि ओली मासळी विक्रीचा व्यवसाय करतात. एसटीतुन गावागावात जाऊन त्या हा व्यवसाय करतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या महिलांना एसटीमध्ये घेण्यास चालक आणि वाहकांकडुन विरोध केला जात आहे. आज सकाळी देखील कणकवली-मौदे या एसटीत चढणाऱ्या महिलांना वाहकाने विरोध केला. मासळी विक्री करणाऱ्या उंबर्डे आणि कोळपे येथील महिलांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी याबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी, हुसेन लांजेकर यांचे लक्ष वेधले. तत्पुर्वीच कोळपे सरपंच आयेशा लांजेकर यांच्या नेतृत्वाखाली आठ ते दहा महिला एसटी बसस्थानकात पोहोचल्या. त्यांनी वाहतुक नियत्रंकांना घडलेला प्रकार सांगत त्यांना चांगलेच धारेवर धरले. जोपर्यत या यासंदर्भात योग्य निर्णय होत नाही, तोपर्यत आम्ही बसस्थानकातून हलणार नाही, अशी भुमिका त्यांनी घेतली. त्यानंतर तत्काळ श्री. काझी आणि श्री. लांजेकर बसस्थानकात पोहोचले. पोलीस निरीक्षक अमित यादव देखील तेथे गेले. श्री. काझी वाहतुक नियंत्रकांशी चर्चा करीत असताना ज्या कणकवली-मौदे एसटीच्या वाहकांनी महिलांना गाडीत घेण्यास विरोध केला ते बसस्थानकात आले. यावेळी श्री. काझी यांनी त्या वाहकांना महिलांना गाडीत न घेण्याचे कारण विचारीत चांगलेच धारेवर धरले. याशिवाय आणखी एक वाहक चर्चेसाठी आले होते. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे वातावरण चांगलेच तापले. यावेळी पोलीस निरीक्षक यादव यांनी सर्वाना शांत करीत वाहतुक नियत्रंकांना सर्व वाहक आणि चालकांना महिलांना गाडीत घेण्याविषयीच्या सुचना देण्यास सांगीतले. असे प्रकार पुन्हा घडु नये म्हणुन वाहतुक नियंत्रकांनी खबरदारी घ्यावी, अशी सुचना देखील त्यांनी केली.

कोट
एकीकडे महिला आर्थिक सक्षम व्हाव्या म्हणून शासन प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे एसटीचे कर्मचारी मासळी विक्रीतून अर्थाजन करणाऱ्या महिलांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे प्रकार जर भविष्यात थांबले नाहीत तर बसस्थानकात ठिय्या आंदोलन छेडले जाईल.
- हुसेन लांजेकर ,जिल्हा उपाध्यक्ष, भाजयुमो

कोट
एसटीला प्रवाशी मिळत नाही म्हणून एसटी बंद केली जात आहे. परंतु, येथे प्रवाशांना एसटीतून प्रवास करण्यास विरोध केला जात आहे. हा कर्मचाऱ्यांचा मनमानीपणा असून तो आम्ही कदापि खपवुन घेणार नाही.
- नासीर काझी, तालुकाध्यक्ष, भाजप, वैभववाडी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68505 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top