राजापूर ःराजवाडी कांगापूर येथे प्रथमच आढळली मगर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःराजवाडी कांगापूर येथे प्रथमच आढळली मगर
राजापूर ःराजवाडी कांगापूर येथे प्रथमच आढळली मगर

राजापूर ःराजवाडी कांगापूर येथे प्रथमच आढळली मगर

sakal_logo
By

-rat16p31.jpg
L29631
ः राजापूर ः मगरीचे वास्तव्य असलेल्या डोहाची पाहणी करताना माजी शिक्षण सभापती दीपक नागले, वनरक्षक सागर गोसावी आणि ग्रामस्थ.
..
-rat16p32.jpg
L29632
ः नदीपात्रामध्ये पाण्याबाहेर येऊन थांबलेली मगर.
--------------
कांगापुरात प्रथमच आढळली मगर!

ग्रामस्थांना सातत्याने दर्शन; वनविभागाची स्पेशल फोर्स करणार बंदोबस्त
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः कोकणच्या अलौकिक निसर्गसौंदर्याचा वारसा लाभलेल्या राजापूर तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये दुर्मिळ प्राणी, पक्ष्यांच्या वावरासह जागतिकस्तरीय फुलवनस्पती आढळून आल्या आहेत. त्यामध्ये आता मगरींची भर पडली आहे. तालुक्यातील राजवाडी कांगापूर येथील लोकवस्तीपासून काही फुटाच्या अंतरावरून वाहणाऱ्‍या नदीपात्रामध्ये येथील ग्रामस्थ किरण बंडबे यांना गत महिन्यामध्ये मगर आढळून आली. गेल्या महिनाभरापासून सातत्याने येथील ग्रामस्थांना ती दिसत असून तिची सुमारे चार फूट लांबी आहे. राजवाडी कांगापूर येथे आढळलेली मगरीच्या माध्यमातून तालुक्यामध्येही मगरींचा वावर असल्याची पहिल्यांदा नोंद झाली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांनी वनविभागाचे वनरक्षक सागर गोसावी आणि ग्रामस्थांसमवेत मगरीचा वावर असलेल्या परिसराची पाहणी केली. कांगापूर येथील नदीपात्रामध्ये मगरीचा वावर असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अनेकवेळा नदीपात्रामध्ये मगरीचे लोकांना दर्शनही होते. या नदीपात्रामध्ये विविध कारणांनिमित्ताने लोकांचा नियमित वावर असतो. नदीपात्रामध्ये आढळलेली मगर लगतच्या खोल डोहामध्ये राहत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या ठिकाणी मगर दिसली त्या ठिकाणी मोठा खोल डोह आहे. त्यामुळे तेथील पाणी कमी करण्यामध्ये अडथळे येणार आहेत. डोहातील पाणी कमी झाल्याशिवाय त्या मगरीला पकडणे शक्य होणार नाही. त्यामुळे मगरीला पकडण्यासाठी वनविभागाच्या स्पेशल फोर्सशी संपर्क साधून त्यांना पाचारण करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये ती स्पशेल फोर्स येऊन मगरीला पकडून तिचा बंदोबस्त करील, अशी माहिती गोसावी यांनी दिली.
--------------
चौकट
नेमकी कशी आणि कुठून आली?
राजवाडी कांगापूर येथे आढळलेली मगर नेमकी कशी आणि कुठून आली? त्या ठिकाणी पूर्वीपासून तिचे वास्तव्य होते का? दिसलेली मगर एकटीच आहे की आणखीन काही तिच्यासोबत मगरींची संख्या आहे, आदी प्रश्‍न पडले आहेत; मात्र, त्या प्रश्‍नांचे कोडे अद्यापही उलडलेले नाहीत.
---------------------------
कोट ः
कांगापूर येथील कांगापूर ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी किरण बंडबे यांना ज्या ठिकाणी मगर आढळून आली. त्यापासून काही फुटाच्या अंतरावर लोकवस्ती आहे. पावसामध्ये हे नदीपात्र पाण्याने दुथडी भरून किनाऱ्‍यावरील घरांच्या दरवाजापर्यंत नदीचे वाढलेले पाणी येते. त्यामुळे या पाण्यातून ही मगर भविष्यामध्ये त्या घरांसह अन्य लोकवस्तीमध्ये घुसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे ही मगर पकडून वनविभागाने अन्यत्र सुरक्षित ठिकाणी तातडीने सोडावी. त्याबाबतची मागणी वनविभागाकडे केली.
- दीपक नागले, माजी शिक्षण सभापती, जिल्हा परिषद

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68519 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top