राजापूर-अर्जूनातील गाळ उपशासाठी व्यापारी आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-अर्जूनातील गाळ उपशासाठी व्यापारी आक्रमक
राजापूर-अर्जूनातील गाळ उपशासाठी व्यापारी आक्रमक

राजापूर-अर्जूनातील गाळ उपशासाठी व्यापारी आक्रमक

sakal_logo
By

-rat16p50.jpg
L29745
ः राजापूर ः कोंढेतड पूल परिसरामध्ये साचलेला गाळ.
---------------
अर्जूनातील गाळ उपशासाठी व्यापारी आक्रमक

तहसीलदारांना निवेदन; पुलासाठीचा भराव पुराला कारणीभूत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ ः मुंबई-गोवा महामार्गावरील पुलाचे बांधकाम करताना अर्जुना नदीपात्रामध्ये टाकण्यात आलेला भराव पावसाळ्यातील शहरातील संभाव्य तीव्र पूरस्थितीला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा भराव काढून टाकून अन्यत्र हलवावा, या मागणीसाठी आता राजापूर तालुका व्यापारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुलाचे बांधकाम करणाऱ्‍या संबंधित ठेकेदार कंपनीने टाकलेला मातीचा भराव पूरस्थितीला कारणीभूत ठरणार असून त्याचा नदीपात्रातून तातडीने उपसा होऊन अन्यत्र नेऊन टाकावा, अशी मागणी व्यापारी संघटनेने येथील तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
पुलाचे बांधकाम करताना संबंधित ठेकेदार कंपनीने नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकलेला आहे. नदीच्या मध्यभागातील पात्रामध्ये टाकण्यात आलेला काही प्रमाणातील भराव संबंधित ठेकेदार कंपनीने काही दिवसांपूर्वी काढला आहे. मात्र, नदीच्या काठावर टाकण्यात आलेल्या भरावापैकी बहुतांश भराव जैसे थे स्थितीमध्ये आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यामध्ये पाण्यासोबत काही प्रमाणात मातीचा भराव वाहून येऊन त्याचा पुंडलिक मंदिर परिसरामध्ये संचय झालेला आहे. या साऱ्‍या स्थितीतून यावर्षी शहरातील पूरस्थितीची तीव्रता अधिक वाढण्याच्या शक्यतेकडे व्यापारी संघटनेने निवेदनाद्वारे तहसीलदारांचे लक्ष वेधले आहे.
...
चौकट
यापूर्वीही सूचना
यापूर्वी नदीपात्रामध्ये टाकण्यात आलेल्या मातीच्या भरावाचा उपसा करण्याची सूचना यापूर्वीच्या तहसीलदारांनी संबंधित ठेकेदार कंपनीला व्यापाऱ्‍यांच्या उपस्थितीमध्ये केली होती; मात्र, त्यांच्या या सूचनेचे संबंधित ठेकेदाराने पालन न केल्याचे या निवेदनामध्ये व्यापारी संघटनेने नमूद केले आहे. संबंधित ठेकेदार कंपनीला नदीपात्रातील मातीचा भराव, गाळाचा उपसा करून तो इतरत्र हलवण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68578 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top