कोलगाव येथे दुचाकीला अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोलगाव येथे दुचाकीला अपघात
कोलगाव येथे दुचाकीला अपघात

कोलगाव येथे दुचाकीला अपघात

sakal_logo
By

swt1635.jpg
29755
कोलगावः कोकण कॉलनी रस्ता चिखलमय झाला आहे.

कोलगाव येथे दुचाकीला अपघात
सावंतवाडीः कोलगाव कोकण कॉलनी परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने तेथे टाकलेल्या दगड आणि मातीचा भराव टाकला होता. त्यामुळे तेथे निर्माण झालेल्या चिखलात घसरून दुचाकीला अपघात झाला. ही घटना आज सायंकाळी मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसानंतर घडली. त्याबाबतची माहिती शिवसेना जिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी दिली. कोकण कॉलनीतून पुढे वेंगुर्ले-बेळगाव रस्त्याला जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने त्या ठिकाणी संबंधित प्रशासनाने दगड आणि माती टाकून खड्डे बुजविले होते; मात्र गुरुवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे तेथे दलदल निर्माण होऊन त्या मार्गाने येणार्‍या काही दुचाकींना अपघाताला सामोरे जावे लागले. यात काहीजण जखमी झाल्याने त्यांना शिवसेनेचे जिल्हा संघटक मणियार यांनी उपचारांकरिता उपजिल्हा रुग्णालयात हलविले. प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या प्रकाराबाबत वाहन चालक तसेच ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68584 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top