
‘गौरव भूमीपुत्रांचा‘ ॲवार्डचे उद्या वितरण
लोगो घेणे
‘गौरव भूमिपुत्रांचा’
ॲवॉर्डचे उद्या वितरण
‘सकाळ’च्या वतीने आयोजन, विविध क्षेत्रांतील भूमिपुत्र एकवटणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अनेकांनी आपले गाव सोडले आणि जगभरातील विविध ठिकाणी जाऊन ही मंडळी आपापल्या क्षेत्रात यशोलौकिकाचे शिलेदार ठरली. मात्र, तरीही त्यांची नाळ आपल्या मातीशी आजही तितकीच घट्ट आहे. अशा भूमिपुत्रांचा गौरव (सन्स ऑफ द सॉईल) ‘सकाळ’च्या वतीने येथे होणार असून, शनिवारी (ता. १८) हा सोहळा सजणार आहे.
हॉटेल सयाजीमध्ये सकाळी अकरा वाजता कोल्हापूर आणि कोकण विभागातील भूमिपुत्रांचा गौरव होईल. तर सायंकाळी साडेसहा वाजता सांगली आणि बेळगाव विभागातील भूमिपुत्रांचा गौरव होईल. एखादे ध्येय उराशी बाळगून आपले गाव सोडायचे आणि दुसऱ्या गावात, शहरात जाऊन ध्येयापर्यंत पोहोचताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर मात करत या भूमिपुत्रांनी आपापली यशकथा साकारली आहे. याच यशकथा नव्या पिढीसमोर याव्यात आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा सोहळा होणार आहे.
चौकट
या भूमिपुत्रांचा होणार गौरव
कोकण विभागातून दिलीप लक्ष्मण गिरप (नगराध्यक्ष, नगर परिषद वेंगुर्ले) राजेश पुरुषोत्तम कदम (प्राथमिक शिक्षक, निवेदक, सामाजिक कार्यकर्ते, कणकवली) रवींद्र रघुनाथ येडगे (निवृत्त सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग) उत्तम सुरेश लोके (ब्रिंदा डेव्हलपर्स, सिंधुदुर्ग) सुनील बी. राऊळ (मुख्य कार्यकारी अधिकारी, सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग) वास्तूआचार्य डॉ. दिनेश बी. नागवेकर (संचालक, घरकुल कन्स्ट्रक्शन, सावंतवाडी) अच्युत के. सावंत-भोसले (कार्यकारी अध्यक्ष, श्री. यशवंतराव भोसले एज्यु. सोसायटी, सावंतवाडी) मोहन सदाशिव संसारे (मेसर्स एम. एस. एस. अॅन्ड सन्स शृंगारतळी) सुनील वामन साळवी (कार्याध्यक्ष को-ऑपरेटिव्ह बॅंक्स एम्प्लॉईज युनियन, मुंबई) या भूमिपुत्रांचा गौरव होईल.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68611 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..