
संगमेश्वर-मिशन आधारमधून पोलिसांचा ज्येष्ठांशी संवाद
मिशन आधारमधून पोलिसांचा ज्येष्ठांशी संवाद
संगमेश्वरला मेळावा ; सहकार्याचे आश्वासन
संगमेश्वर, ता. १७ ः रत्नागिरी पोलिसांच्यावतीने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून मिशन आधारअंतर्गत संगमेश्वर पोलिस ठाण्यातर्फे ज्येष्ठ नागरिक मेळावा घेण्यात आला. हा मेळावा धामणीतील हॉटेल ड्राईव्ह इन् हॉलला झाला. मेळाव्याला ५०० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
मेळाव्यात डॉ. गर्ग म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांकडून सर्वप्रकारे सहकार्य केले जाईल. तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. पोलिस व ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मिशन आधारची सविस्तर माहिती ज्येष्ठ नागरिकांना सांगितली. कार्यक्रमात अभिनेत्री, लेखिका व निवेदिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी मनुष्य जीवनाबाबत माहिती दिली. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य रवींद्र खानविलकर यांनी अंधश्रद्धेविषयी समज-गैरसमज पटवून दिले. इन्फिगो आय केयर हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. ठाकूर देसाई यांनी डोळ्याच्या समस्या व आरोग्याविषयी घ्यावयाची काळजी या विषयी माहिती दिली. डॉ. भगवान नारकर यांनी व्यायामाबद्दल आणि अनुराधा नारकर यांनी आरोग्यासाठी योग किती महत्वाचा आहे, याचे मार्गदर्शन केले. या वेळी युयुत्सु आर्ते, श्रीनिवास पेंडसे, निबंधक कानिटकर, मुरलीधर बोरसुतकर, प्रमोद शेट्ये यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे व पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68756 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..