रत्नागिरी-सैतवडे पेठ मोहल्ल्यात संरक्षण भिंतीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-सैतवडे पेठ मोहल्ल्यात संरक्षण भिंतीची मागणी
रत्नागिरी-सैतवडे पेठ मोहल्ल्यात संरक्षण भिंतीची मागणी

रत्नागिरी-सैतवडे पेठ मोहल्ल्यात संरक्षण भिंतीची मागणी

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat17p12. jpg- KOP22L29839
रत्नागिरी ः सैतवडे पेठ मोहल्ला येथील गौरी आंबानजीक खचलेल्या रस्त्याची पाहणी करताना ग्रामस्थ.
-----
सैतवडे पेठ मोहल्ल्यात
संरक्षण भिंतीची मागणी
रत्नागिरी, ता. १७ ः सैतवडे पेठ मोहल्ला येथील गौरी आंबा येथे संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. येथील रस्ता खचून रस्त्यालगत दरी निर्माण झाली असून येथे दुर्घटना संभावित आहे. दुर्घटना टाळण्यासाठी येथे संरक्षण भिंत बांधण्याची मागणी करण्यात आली आहे. सैतवडे पेठ मोहल्ला ते जाभांरी या दरम्यान रिक्षा, टेंपो, ट्रक, स्कुल बस व इतर मोठ्या वाहनांची वर्दळ असते. मोठ्या गाड्या ये-जा करत असताना गौरी आंबा पेठ मोहल्ला, सैतवडे येथे रस्त्याच्या बाजूला मोठी दरी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्याची आणखीन दुरवस्था होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी अपघात होवू शकतो. त्यामुळे तातडीने संरक्षण भिंत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बांधावी अशी मागणी ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, संस्था यांच्यावतीने करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68757 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top