धामणीतील शाळा पाडल्याने संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणीतील शाळा पाडल्याने संताप
धामणीतील शाळा पाडल्याने संताप

धामणीतील शाळा पाडल्याने संताप

sakal_logo
By

rat१७p७.jpg
२९८३४
संगमेश्वरः धामणी आदर्श शाळा तोडल्याप्रकरणी माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा.
--------------
धामणीतील शाळा पाडल्याने संताप
संगमेश्वर ः मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी आदर्श शाळा क्र. १ ही शाळा अनधिकृतरित्या तोडणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत ग्रामस्थांनी २७ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत पत्रकार परिषद घेतली. धामणी येथे आदर्श शाळा क्र. १ आहे. या शाळेमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग आहेत. ७५ वर्षांपूर्वी पहिली ते सातवीकरिता पाच वर्गखोल्या बांधण्यात आल्या होत्या. मात्र आता ही शाळा तोडण्यात आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
----------
rat१७p८.jpg
29835
देवरूखः ओझरे येथे वृक्षलागवड करताना स्वस्तिक युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
----------------
ओझरेत १०१ रोपांची लागवड
देवरूख ः स्वस्तिक युवा प्रतिष्ठानच्या वतीने ओझरे येथे वड व पिंपळाच्या १०१ रोपांची लागवड करण्यात आली. या रोपांच्या संगोपन व संवर्धनाची जबाबदारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. प्राणवायू देणारा वृक्ष म्हणून वटवृक्षाकडे पाहिले जाते. वटवृक्षाला आयुर्वेदातही अनन्यसाधारण महत्त्व आहे. हीच कास स्वस्तिक युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हेरून वटपौर्णिमेचे औचित्य साधून देवरूख-ओझरे मार्गावर वडासह पिंपळाच्या रोपांची लागवड केली. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाया खामकर, उपाध्यक्ष प्रकाश मोरे, राजा गायकवाड, अजिंक्य नाफडे, मुन्ना थरवळ, स्वप्नील कांगणे, संकेत नार्वेकर, संग्राम बनगर, सूरज शिंदे, डॉ. सुशील भालेकर यांसह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
-----------
rat१७p९.jpg
29836
चिपळूणः डेरवण येथे वटपौर्णिमा निमित्ताने वृक्षारोपण करताना महिला भगिनी.
--------------
वटपौर्णिमेनिमित्त डेरवणला वृक्षारोपण
चिपळूण ः वटपौर्णिमा सणानिमित्त सावर्डे-डेरवण विभागातील महिलांनी वटवृक्षरोपण करून त्याचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प केला. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सावर्डे विभागातील रसत्याच्या बाजूला असणारी अनेक वटवृक्षांची तोड करण्यात आली. परिणामी वटवृक्षाच्या झाडांची संख्या घटली. वटवृक्षाद्वारे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन मिळतो तसेच वटवृक्षाचा उपयोग विविध आजारांवर गुणकारी औषध म्हणून केला जात असल्याने त्याचे हे सर्वांगीण महत्त्व लक्षात घेता व वृक्षरोपणाचा संकल्प हाती घेतलेल्या सावर्डे विभागातील महिलांनी वटवृक्षरोपण केले. कार्यक्रमाला माजी सभापती पूजा निकम व उद्योजक अभिषेक सुर्वे यांचे सहकार्य लाभले. या वेळी माजी सभापती निकम, सरपंच समिक्षा बागवे, सुभाष सुर्वे, डॉ. सुचिता पाटिल, डॉ. वर्षा खानविलकर , सई निकम, प्रिया विचारे, विद्या सावंत, लिना बोंडे, श्वेता भोसले, कांचन खोत, अरुणा घाडगे, विद्या कुसुमडे, वैशाली घराळे आदी उपस्थित होते.
-----------------
rat१७p१०.jpg
29837
खेडः प्रांताधिकारी राजश्री मोरे यांच्या हस्ते अक्षय महाडीक यांचा सन्मान करण्यात आला.
--------------
अक्षय महाडिक यांचा गौरव
खेड ः युपीएससी परीक्षेत देशात २१२ व्या क्रमांकासह उतीर्ण होऊन आयएएस बनण्याचा मान मिळवणार्‍या अक्षय महाडिकचा नुकताच येथील प्रांताधिकारी राजश्री मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी मोरे यांनी अक्षय महाडिक याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी अक्षयसमवेत त्यांचे वडील संजय महाडिक व कुटुंबीय उपस्थित होते.
---
rat१७p११.jpg
29838
खेडः मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचा सन्मान करताना संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त विकास वालावलकर.
-----------------
डेरवणात विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन
खेडः श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज् ट्रस्ट, डेरवण या संस्थेतर्फे विज्ञान भारतीच्या सहयोगाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विज्ञान महोत्सव झाला. महोत्सवाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या वेळी विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव जयंतराव सहास्त्रबुद्धे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या वेळी मान्यवरांचा सत्कार संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त विकास वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आला. महोत्सवात नर्सरी ते पीजी असे सर्व विद्यार्थी सहभाग घेतील. स्वातंत्र्य समरातील वैज्ञानिकांच्या योगदानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण होईल. आत्मनिर्भर भारत अभियानासाठी पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. हा महोत्सव १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून, यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विज्ञानविषयक विविध स्पर्धा, मान्यवरांची सत्रे, व्याख्याने, कार्यशाळा, वैज्ञानिक चित्रपटांचे सादरीकरण, मुलाखत, परिसंवाद, शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. विज्ञान महोत्सवातील वैज्ञानिक उपक्रम हे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पाच स्तंभांवर आधारित असतील. यामध्ये प्रामुख्याने स्वातंत्र्यसंग्राम, कल्पना, क्रिया, उपलब्धी, प्रतिज्ञा या स्तंभांवरच हे वैज्ञानिक उपक्रम आधारित आहेत. या महोत्सवाला तालुक्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, अशी माहिती श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल स्ट्रट संचलित इंग्रजी माध्यम शाळेच्या संचालिका शरयू यशवंतराव यांनी दिली.
---

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68760 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top