
टुडे पान एक अँकर-सावंतवाडीतील ''त्या'' शाळेची अखेर दुरुस्ती
29866
सावंतवाडी ः बांधकाम अभियंता अनामिका चव्हाण यांचे आभार मानताना मुख्याध्यापिका शुभलता सुकी.
एक निवेदन अन् ‘माऊली’च्या मायेला पाझर!
बांधकाम अभियंत्यांची संवेदनशिलता; सावंतवाडीतील शाळेची अखेर दुरुस्ती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः पद कोणतेही असो त्या पदावर बसल्यानंतर समोरच्या व्यक्तीला किती न्याय मिळतो यावर त्या पदाची शान ठरत असते. याचाच प्रत्यय सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांच्या कामातून आला. येथील शाळा क्रमांक पाचच्या छपराची दुरुस्ती करुन मुलांना सुरक्षित शिक्षणाबरोबर एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
येथील शाळा क्रमांक ५ या मराठी शाळेची झालेली पडझड बघून अनेकांचे मन हेलावून जात होते. त्याला कारण होते, शाळेत शिक्षण घेत असलेली लहान मुले छप्पर डोक्यावर आले असतानाही जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे घेत होती; पण कोणालाच पाझर फुटत नव्हता; मात्र मुख्याध्यापिका शुभलता सुकी यांच्या एका निवेदनातून कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तत्काळ शाळेचे छप्पर दुरूस्त करत डागडुजीही केली. त्यामुळे विद्यार्थी व पालक शिक्षकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ही शाळा पोलिस लाईन जवळ आहे. शहरातील सर्व शाळा या जिल्हा परिषदच्या अखत्यारित येतात; पण ही शाळा त्याला अपवाद असून एकमेव शाळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येते. त्यामुळे या शाळेकडे दुर्लक्ष होत होते. शाळेचे छप्पर दुरूस्त नाही, शाळेजवळील धोकादायक झाडे आदी समस्यांमुळे पालक मुलांना या शाळेत पाठवताना अनेक वेळा विचार करत होते. या शाळेत विद्यार्थ्यांबरोबर ज्ञानदान करणारे शिक्षकही जीव मुठीत घेऊन आपले रोजचे काम करत होते. न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न सर्वानाच पडत असल्याचे दिसत होते. अनेकांना ही शाळा सार्वजनिक बांधकामकडे येते हे ही माहिती नव्हते; मात्र सध्याच्या मुख्याध्यापिका सुकी यांनी हे शोधून काढत बांधकाम विभागासोबत पत्रव्यवहार सुरू केला. वर्षभरात त्यांनी अनेकदा पत्र पाठवली; पण कोणीही दखल घेतली नाही. अखेर त्यांना न्याय मिळाला तो एका महिलेकडूनच. कार्यकारी अभियंता चव्हाण या अलिकडेच सावंतवाडीत नियुक्त झाल्या आहेत. त्यातच त्या स्थानिक असल्याने आणि त्याच रस्त्याने य-जा करत असल्याने त्यांनी शाळेची स्थिती बघितली आणि शाळा दुरूसतीचा निर्णय घेतला आणि शाळा दुरूस्त करून मुलांच्या सेवेतही आली.
---
चव्हाण यांचे मानले आभार
शिक्षकांनी ही शाळा दुरूस्ती झाल्याने सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंता चव्हाण यांचे आभार मानले. काम झाल्यानंतर क्वचितच आभार मानले जातात; पण शाळेच्या मुख्याध्यापिका सुकी यांनी बांधकामच्या कार्यालयात जाऊन आभार मानत अशक्यप्राय काम करून दिल्याची आठवण करुन दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68777 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..