
गोखले कन्याशाळेच्या दुरुस्तीसाठी देणार निधी - आमदार साळवी
rat१७p२२.jpg
२९८५४
राजापूरः गोखले कन्याशाळेची पाहणी करताना आमदार राजन साळवी, गटविकास अधिकारी सुहास पंडित, गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू, प्रकाश कुवळेकर, राजाभाऊ रसाळ, अनिल यादव आदी.
----------------
सकाळ बातमीचा परिणाम--लोगो
गोखले कन्याशाळेच्या दुरुस्तीसाठी देणार निधी
आमदार साळवी; ११५ वर्षापूर्वीच्या शाळेची दुरवस्था, शाळेची केली पाहणी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ ः सुमारे ११५ वर्षापूर्वीच्या शहरातील जिल्हा परिषदेच्या गोखले-कन्या शाळेला विविध भौतिक आणि शैक्षणिक सुविधांची आवश्यकता आहे. त्या सुविधांची उभारणी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आमदार राजन साळवी यांनी आश्वासित केले. या वेळी साळवी यांनी शाळेच्या इमारतीच्या झालेल्या दुरवस्थेसह कंपाऊंड वॉल यांसह अन्य अपुऱ्या सुविधांची पाहणी केली.
या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवेळकर, प्रभारी गटविकास अधिकारी सुहास पंडित, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ रसाळ, ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर, मुख्याध्यापक अनिल यादव, शिवसेना विभागप्रमुख नरेश दुधवडकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. सुमारे ११५ वर्षापूर्वी स्थापना झालेल्या गोखले कन्याशाळेमध्ये यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजी वर्गांना सुरवात झाली आहे. सातवीपर्यंतच्या असलेल्या या शाळेमध्ये अनेक भौतिक आणि शैक्षणिक सुविधांची वानवा आहे. त्या अनुषंगाने आमदार साळवी यांनी आज गोखले कन्याशाळेला भेट देऊन इमारतींसह अन्य सुविधांची पाहणी केली. या वेळी त्यांच्याशी संवाद साधताना सामाजिक कार्यकर्ते रसाळ, मुख्याध्यापक यादव यांनी शाळेच्या इमारतीच्या छप्पराच्या झालेल्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. नादुरुस्त असलेली ही इमारत कधीही खाली कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहे. या प्रशाळेला कंपाउंड वॉलचीही आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त अन्य शैक्षणिक सुविधांची वानवा असून त्या भौतिक आणि शैक्षणिक सुविधा उभारण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी आमदार साळवी यांच्याकडे केली. त्यानंतर आमदार साळवी यांनी शाळेमध्ये भौतिक आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68792 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..