
पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू
पदव्युत्तर अभ्यासक्रम
प्रवेश प्रक्रिया सुरू
रत्नागिरी, ता. १७ : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उप परिसरात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना एमएस्सीच्या रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र हे अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहेत.
एमएस्सी रसायनशास्त्र विभागासाठी ६० जागा असून ऑरगॅनिक, ॲनालिटीकल, फिजिकल तसेच इनऑरगॅनीक रसायनशास्त्र विषयातील स्पेशलायझेशनमध्ये प्रवेश दिला जातो. झुलॉजी विभागामध्ये ओशनोग्राफी स्पेशलायझेशनसाठी २५ जागा असून अभ्यासक्रम विषेशतः सामुद्रिक अभ्यास व फिशिंग व फिश प्रोसेसिंग कौशल्याधारित आहे. त्यामुळे संबंधित उद्योगातील रोजगार तसेच संशोधन संधी उपलब्ध होतात.
पर्यावरणशास्त्र विभाग गेली वीस वर्ष रत्नागिरी उपपरिसरात सुरू आहे. प्रवेश क्षमता २० विद्यार्थी आहे. या विभागाचे वैशिष्ट्य म्हणजे पी. एचडी. सेंटर या विभागात उपलब्ध आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संशोधन केंद्र याठिकाणी आहे. तिन्ही विभागाची स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. विद्यार्थ्यांच्या नेट आणि सेट परीक्षेची तयारी देखील करून घेतली जाते.
याकरिता नोंदणी करणे आवश्यक असून मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन रत्नागिरी उपपरिसराच्या वेबपेजवरील लिंकच्या माध्यमातून नोंदणी करावी. शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या फीच्या सवलती या उपकेंद्राला लागू आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित नावनोंदणी करून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी संपर्क साधावा, असे आवाहन उपपरिसराचे प्रभारी कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68797 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..