आकेरी क्र. 1 शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आकेरी क्र. 1 शाळेत
प्रवेशोत्सव उत्साहात
आकेरी क्र. 1 शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

आकेरी क्र. 1 शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

sakal_logo
By

L२९८८५

आकेरी ः नवागत विद्यार्थ्यांसमवेत पालक व शिक्षक.

आकेरी क्र. १ शाळेत
‘प्रवेशोत्सव’ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आकेरी क्र. १ या प्राथमिक शाळेत बुधवारी ‘प्रवेशोत्सव’ व शाळापूर्व तयारी मेळावा (क्र. २) उत्साहात साजरा करण्यात आला. जनजागृतीसाठी प्रभातफेरी काढण्यात आली. नवागतांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेच्या नावाचा मुकुट; तसेच स्वतःच्या नावाचे बॅज देऊन शाळेत प्रवेश देण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांचे विकास पत्र भरून त्यांच्या शारीरिक, भाषिक, गणितीय विकासाचे पत्रक याची पडताळणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धेश घोगळे, उपाध्यक्ष चंद्रकांत आकेरकर, संजय खवणेकर, केंद्रप्रमुख गोविंद चव्हाण, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक, माता-पालक संघाचे उपाध्यक्ष व सदस्य, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष व सर्व सदस्य; तसेच शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष व सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका श्रीमती राऊळ, मदतनीस श्रीमती साळगावकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका श्रीमती दाभोलकर यांनी स्वागत केले. श्रीमती जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
.............
कुडाळात दोन पदाधिकारी भाजपमधून निलंबित
कुडाळः जांभवडे येथील भाजप पदाधिकारी सुभाष मडव यांच्यावर जिल्हा बँक निवडणुकीत भाजप पुरस्कृत अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवणे आणि जांभवडे विकास संस्थेच्या भाजप पुरस्कृत उमेदवारांच्या विरोधात पॅनेल उभे केल्याने त्याचप्रमाणे वेळोवेळी सूचना देऊनही पक्षशिस्तीचे पालन न केल्याने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आली होती. त्यांनी या नोटिसीला उत्तर न दिल्याने त्यांच्यावर सहा वर्षांकरिता पक्ष निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी पत्रकातून दिली आहे. श्री. साईल यांनी पत्रकात म्हटले आहे की, आवळेगाव येथील आवळेगाव-टेम्बगाव भाजपा बूथ कमिटी अध्यक्ष महादेव सावंत यांनी पक्षशिस्तीचे पालन न केल्याने त्यांना देखील जिल्हाध्यक्ष तेली यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष साईल यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर न दिल्याने साईल यांनी श्री. सावंत यांच्यावर सहा वर्षांकरिता पक्ष निलंबनाची कारवाई केली आहे.
...............
L29883

हरकुळ बुद्रुक ः येथील शेतकऱ्यांना कृषिदूतांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
---
हरकुळ बुद्रुक येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कणकवलीः ‘‘शेतीचे ज्ञान घेऊन उत्पादनवाढ अथवा आर्थिक उन्नती होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष मातीमध्ये उतरून शेतकऱ्यांनी काम केल्यास यश मिळाणार आहे,’’ असे मार्गदर्शन कृषिदूतांनी हरकुळ बुद्रुक येथे शेतकऱ्यांना केले आहे.
ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभवांतर्गत शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन या अनुषंगाने फोंडाघाट मराठे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले. ग्रामीण कृषी जागरुकता विकास योजना कार्यानुभव प्रकल्पांतर्गत कृषिदूतांचे हरकुळ बुद्रुक येथे शेतकऱ्यांनी स्वागत केले.
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कशी फायदेशीर असते, यावर आधारित प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावा, तज्ज्ञांची कृषीविषयक मार्गदर्शनपर व्याख्याने, डेमो आदींचे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन या प्रकल्पामधून होणार आहे. कृषिदूतांनी सेंद्रिय व रासायनिक बीजप्रक्रिया, सरीवाफा पद्धत, माती परीक्षणाबद्दल जागरुकता करून माहिती दिली. यावेळी सरपंच सौ. पटेल, उपसरपंच श्री. परब, ग्रामसेवक श्री. कवटकर, कृषी सहायक श्री. तेली यांचे सहकार्य मिळाले. प्रगतशील शेतकरी मारुती चव्हाण, दिलीप चव्हाण, शंकर तिवरेकर, मनोहर तिवरेकर, जयदीप सोहनी, अशोक जुवेकर आदी उपस्थित होते. यावेळी कृषिदूत विशाल भोसले, सोहेल शेख, सागर कदम, सुयश काकडे, संकेत पिंजारी, ओेम माने, माऊली गोरड, पृथ्वीराज वाघमोडे उपस्थित होते. प्रा. डॉ. योगेश जंगले यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68816 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top