चिपळूण ः पां. वा. काणे यांची पत्रे ''लोटिस्मा''कडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः पां. वा. काणे यांची पत्रे ''लोटिस्मा''कडे
चिपळूण ः पां. वा. काणे यांची पत्रे ''लोटिस्मा''कडे

चिपळूण ः पां. वा. काणे यांची पत्रे ''लोटिस्मा''कडे

sakal_logo
By

( पान २ अॅंकर )

फोटो ओळी
-rat१७p३२.jpg,KOP22L29940
rat१७p३३.jpg ःKOP22L29941
चिपळूण ः दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील कड्यावरील गणपती देवस्थानचे अध्यक्ष विनायक नित्सुरे यांच्या संग्रहातील महामहोपाध्याय काणे यांच्या हस्ताक्षरातील पत्र.

भारतरत्न पां. वा. काणे यांची पत्रे ''लोटिस्मा''कडे
वस्तूसंग्रहालय झाले संपन्न ; विनायक नित्सुरेंनी जपलेला ठेवा
चिपळूण,ता. १७ ः ''भारतरत्न'' डॉ. पांडुरंग वामन काणे यांच्या हस्ताक्षरातील पत्रे येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तूसंग्रहालयास प्राप्त झाली आहेत. दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील कड्यावरील गणपती देवस्थानचे अध्यक्ष विनायक नित्सुरे यांच्या संग्रहात असलेली काणे यांची पत्रे त्यांनी वस्तूसंग्रहालयाला भेट दिली आहेत. विनायक नित्सुरे यांचे आजोबा स्व. भालचंद्र गजानन नित्सुरे यांच्याशी डॉ. पां. वा. काणे यांचे नातेसंबंध होते. १९३३ ते १९४१ या कालावधीत झालेला हा पत्रव्यवहार असून, एकूण सहा पत्रे आहेत. भारतरत्न काणे यांच्या हस्ताक्षरातील हा मोलाचा ठेवा विनायक नित्सुरे यांनी विश्वासाने लोटिस्माच्या संग्रहालयाला दिला आहे.
''भारतरत्न'' महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांचा जन्म चिपळूणजवळील परशुराम गावी ७ मे १८८०ला झाला होता. डॉ. पां. वा. काणे हे थोर संस्कृततज्ञ, धर्मशास्त्राच्या इतिहासाचे लेखक, संशोधक आणि अभ्यासक होते. नुकताच १८ एप्रिल २०२२ला त्यांचा ५०वा स्मृतिदिन पार पडला. त्यांच्या ५०व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून राजभवनात टपाल तिकिटाचे प्रकाशन झाले होते. त्यांच्या प्रगाढ विद्वत्तेचा गौरव करणारी, ब्रिटिश सरकारने दिलेली ''महामहोपाध्याय'' ही सन्मान्य पदवी १९४२ साली आणि ''भारतरत्न'' हा सर्वोच्च सन्मान १९६३ मध्ये त्यांना मिळाला होता. डॉ. काणे त्यांच्या नावावर ३९ ग्रंथ (२३ इंग्रजी, १ संस्कृत, ८ मराठी, ६ हिंदी व १ कन्नड) आहेत. इंग्रजी व मराठीतील संशोधनपर ११५ लेख, पुस्तक परिचय व ४५ परीक्षणे आहेत. त्याचप्रमाणे अनेक संस्कृत ग्रंथांच्या सटीप, संपादित आवृत्त्या आहेत. त्यांनी आयुष्यभरात सुमारे १५ हजार छापिल पृष्ठे एवढा मजकूर लिहिला. ज्यातील जवळजवळ निम्मा भाग हा धर्मशास्त्राच्या इतिहासाचा आहे. एका संशोधक-लेखकाने व्यासंगाच्या जोरावर एवढी ग्रंथनिर्मिती करणे हा एक विक्रम आहे. लोटिस्माचे कार्यवाह विनायक ओक यांनी विनायक नित्सुरे यांच्या अमूल्य देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, ''या देणगीमुळे संग्रहालयात मोलाची भर पडली आहे. यापुढेही आपल्या सहकार्याने हे वस्तूसंग्रहालय समृद्ध होईल'', असा विश्वास व्यक्त केला आहे. या वेळी श्रीगणपती देवस्थान आंजर्लेचे कार्याध्यक्ष सुरेश म्हादलेकर आणि सुधीर गोखले उपस्थित होते.

चौकट

दुर्मिळ नाणी देण्यास होकार
विनायक नित्सुरे हे दुर्मिळ नाण्यांचे संग्राहक असून, अनेक कालखंडातील नाणी त्यांच्या संग्रहात आहेत. ''लोटिस्मा''च्या संग्रहालयासाठी त्यांनी नाणी देण्यास होकार दिला आहे. त्यामुळे चिपळूण परिसरावर ज्या राजवटी झालेल्या आहेत. त्या सर्व कालखंडातील नाणी वस्तूसंग्रहालयात पाहायला मिळणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68865 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top