
संक्षिप्त
फोटो ओळी
-rat१७p१७.jpg ः २L२९८४४ खेड : शहरातील वैश्यभवन सभागृहात खेड नगरपालिकेतर्फे आयोजित आपत्ती निवारण प्रशिक्षण कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित अनिरुद्ध अॅकॅडमीच्या सदस्यांचा सत्कार करताना तहसीलदार प्राजक्ता घोरपडे.
-----------
खेड पालिकेतर्फे आपत्ती निवारण मार्गदर्शन
खेड ः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाने खेड पालिकेतर्फे अनिरुद्ध अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट रत्नागिरी यांच्यामार्फत नुकताच शहरातील वैश्यभवन येथे आपत्ती निवारण प्रशिक्षण घेण्यात आले. या वेळी उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पालिकेचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर उपस्थित होते. या वेळी अनिरुद्ध ॲकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे संजय नेसरीकर, हेरंब सावंत, राजेश धुरी, नलिनी शिंदे, वंदना झगडे, सुजाता कदम, विलास पावस्कर आदींनी मार्गदर्शन केले.
---------------------
निराधार योजनेस दरवर्षी
उत्पन्नाचा दाखला कशासाठी?
चिपळूण ः महाराष्ट्र शासनाची संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सुरू आहे. निराधाराला आधार मिळावा म्हणून शासनाने या योजना सुरू केलेल्या आहेत. निराधाराला शासनाकडून तहसीलदार कार्यालयातून वरील आधार मिळावा म्हणून पेन्शन ही योजना सुरू आहे. प्रत्येक वर्षी या योजनेसाठी लाभार्थी करून उत्पन्नाचा दाखला मागितला जातो. पेन्शनव्यतिरिक्त निराधारांना उत्पन्न नाही, मग वार्षिक उप्तन्नाचा दाखला कशासाठी मागितला जातो? असा सवाल माजी सभापती शौकत मुकादम यांनी उपस्थित केला आहे. मुकादम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिलेल्या निवेदनानुसार, ज्या निराधार व्यक्ती आहेत त्यांना शासनाकडून आधार मिळावा म्हणून पेन्शन योजना सुरू आहे. निराधार वयोवृद्ध कुठलाही व्यवसाय करू शकत नाही. म्हणून शासनाने ही योजना सुरू केली आहे. चिपळूण तालुक्यामध्ये सुमारे ५ हजार लोक या योजनेचा लाभ घेतात. हयात असल्याचा दाखला मागणे हे योग्य आहे; परंतु संबंधित लोकांकडून प्रत्येक वर्षी उत्पन्नाचा दाखला मागणे हे चुकीचे आहे. पेन्शनव्यतिरिक्त निराधाराला कुठलाही उत्पन्न नसतो तरी उत्पन्नाचा दाखला मागणे बंद करावे, अशी मागणी मुकादम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
----------------
(टीप- दोन्ही फोटो सेम असले तरी वेगवेगळे आहेत. जुळे आहेत.)
फोटो ओळी
-rat१७p२६.jpg- सुजल पवार--KOP२२L२९९०३
-rat१७p२७.jpg- तन्मय पवार-KOP२२L२९९०४
-----------------
पाध्ये इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के
साडवली ः देवरूख येथील श्रीमती अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. स्कूलमधून ४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये सुजल पवार (९८.८०), तन्मय पवार (९८.६०), वेद जागुष्टे (९८.२०), सृष्टी भाटकर (९७.८०), राशी अडुरे (९७.६०) यांनी अनुक्रमे प्रथम पाच क्रमांक पटकावले. सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक यांचे पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र राजवाडे, मुख्याध्यापक सोनाली नारकर, दिक्षा खंडागळे, राहुल फाटक, आदिती भावे, सुधीर गावडे, जेनिफर गाडगीळ आदीनी अभिनंदन केले आहे. दहावी व बारावी गुणवंतांचा सत्कार सोहळा १८ जूनला ए. के. जोशी हॉलला होणार आहे.
-----------------
देवरूख न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ९५.२९ टक्के
साडवली ः दहावीच्या परीक्षेत देवरूखच्या न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ९५.२९ टक्के लागला. या शाळेत तन्मय नाईक (९६.८० टक्के), अनुष्का परशराम (९५), सुहानी जोयशी (९३.२०) यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. परीक्षेला बसलेल्या २५५ पैकी २४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, शाळा समिती अध्यक्ष सौ. नेहा जोशी, मुख्याध्यापिका सौ. माया गोखले, उपमुख्याध्यापक मधुकर कोकणी आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68874 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..