
रत्नागिरी जिल्ह्यात 20, 21 जूनला ऑरेंज अर्लट
२०, २१ जूनला ऑरेंज अर्लट
रत्नागिरी, ता. १७ः भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. १९ जूनला जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तसेच २० व २१ जून या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात ऑरेंज अर्लट जारी केला आहे. त्यामुळे जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. मान्सूनच्या हुलकावणीमुळे बळीराजा हैराण आहे. मान्सून सक्रीय झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले असले तरी पावसाचा जोर म्हणावा तसा नाही. शुक्रवारी दिवसभर कडकडीत ऊन पडले होते. पेरण्या पूर्ण झाल्या असून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र दिवसभर प्रचंड उष्मा आणि सायंकाळी किंवा पहाटे पाऊस पडतो. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलासा देणारा संदेश दिला आहे. येत्या रविवारपासून कोकणासह जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २०, २१ ला मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68892 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..