
संगमेश्वरमधील 35 विद्यालयांचा निकाल 100 टक्के
३५ विद्यालयांचा
निकाल १०० टक्के
संगमेश्वर तालुका
देवरूख, ता. १७ ः संगमेश्वर तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.७९ टक्के लागला असून तालुक्यातून २२४६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २२१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील तब्बल ३५ विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
मिनाताई ठाकरे विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयात दिक्षा भालेकर (९७.४० टक्के), साहिल जाधव (९७), हर्ष खैरनार यांनी क्रमांक पटकावल. साखरप्यातील कबनुरकर हायस्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. गायत्री सावंतने (९२.४०) प्रथम क्रमांक मिळवला. अमर वाझे आणि समृद्धी ढवळ यांनी द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. बुरंबाड येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये श्रावणी पेणकर, अनाया कुंभार, अलिशा कापडी यांनी क्रमांक मिळवले. ताम्हाने विद्यामंदिरचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेतील ६५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विराज पाताडे, नेहा पाब्ये, सारिका डुकरे यांनी क्रमांक मिळवले. देवळेतील कानडे आयडियल हायस्कूलमध्ये मंजिरी परशेट्ये, विदीषा जाधव, सिद्धी धुमक यांनी क्रमांक मिळवला. शाळेचा निकाल १०० टक्के लागला. आंगवली येथील जनता विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. वेदीका लिंगायत, करण खांडेकर, केतन कदम यांनी क्रमांक मिळवले. बुरंबी येथील दादासाहेब सरफरे विद्यालयाचा निकाल १०० लागला असून सार्थक गेल्ये, मिताली जाधव, सोनाली धुमक यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवले. निवे बुद्रुक येथील माध्यमिक आश्रमशाळेचा निकालही १०० टक्के लागला. मंथन राऊत, प्रेरणा मालप, सेजल कुळ्ये यांनी क्रमांक मिळवले. कसबा हायस्कूलचा निकाल ९९ टक्के लागला असून जुवेरिया रईस शेख, सुशील बसवणकर, आफान खान यांनी क्रमांक मिळवले. वाशी विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. यात स्वानंदी मादगे, साक्षी आंबेकर, श्रावणी लिंगायत यांनी क्रमांक मिळवले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68927 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..