टेम्पो पलटी होऊन नांदगावात चालक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेम्पो पलटी होऊन नांदगावात चालक जखमी
टेम्पो पलटी होऊन नांदगावात चालक जखमी

टेम्पो पलटी होऊन नांदगावात चालक जखमी

sakal_logo
By

टेम्पो पलटी झाल्यामुळे
नांदगावात चालक जखमी
नांदगाव, ता. १७ ः नांदगाव तिठ्ठा ओव्हर ब्रीजवर पुन्हा एक अपघात झाला. यावेळी गोव्याहून रत्नागिरीकडे जाणारा टेम्पो पलटी झाल्याने चालक किरकोळ जखमी झाला. वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले. आज सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे अपघातांचे ग्रहण संपता संपेनासे झाल्याचे या घटनेवरून दिसून आले. नांदगाव तिठ्ठा ते ओटव फाटा दरम्यानच्या परिसरात अपघाताची मालिका सुरूच असून आज सायंकाळी आपल्या ताब्यातील मालवाहतूक करणारा महिंद्रा सुप्रो टेम्पो घेऊन चालक श्री. अली सुलेमान काळसेकर हे साखरी नाटे (ता.रत्नागिरी) येथे जात असताना नांदगाव ओव्हर ब्रीजवरून आले असता वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडला. या अपघातात चालक श्री. अली हे किरकोळ जखमी झाले. त्यांना स्थानिकांच्या मदतीने नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस हेड कॉन्स्टेबल घारकर आणि पोलिस नाईक दळवी हे दाखल झाले होत वाहन बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y68995 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top