
मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा छडा
फोटो
30065
३००६३
अलंकार पाटील, अमर खामकर, करण शिंदे, अभिषेक सपाटे, सुशांत कांबळे, सुशांत गायकवाड.
दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा छडा
पावणेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच जणांचा समावेश; २४ गुन्ह्यांची उकल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ ः शहराच्या वेगवेगळ्या भागांतून मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात जुना राजवाडा पोलिसांना यश आले. पाच जणांच्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली, तर अन्य तिघांना ताब्यात घेतले आहे. दोघांकडून २४ गुन्ह्यांची उकल करून पावणेसहा लाखांहून अधिक किमतीच्या मोटारसायकली जप्त केल्या. अलंकार बाबूराव पाटील (वय २१, रा. सावे, शाहूवाडी) आणि अमर निवास खामकर (२५, रा. मलकापूर, शाहूवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. अन्य तिघे शाहूवाडी तालुक्यातील आहेत. ही माहिती शहर पोलिस उप-अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
तिघे साथीदारही ताब्यात
चोरीच्या मोटारसायकल विक्रीच्या कामात सहकार्य करणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील अन्य तिघा संशयितांना ताब्यात घेतले. सुशांत चंद्रकांत गायकवाड (रा. येळणे, शाहूवाडी), सुशांत बबन कांबळे (रा. परळे, ता. शाहूवाडी) आणि करण विठ्ठल शिंदे (रा. उचगाव, करवीर) अशी त्या संशयितांची नावे आहेत. पाचही संशयितांकडून ५ लाख ८५ रुपये किमतीच्या २४ मोटारसायकल जप्त केल्या. ते तिघे अलंकार व अमरकडून चोरीच्या मोटारसायकल स्वस्तात घेऊन त्या लपवून ठेवायचे. ग्रामीण भागातील ग्राहक शोधून त्याची आठ ते दहा हजाराला विक्री करण्याच्या प्रयत्नात होते, अशी माहिती तपासात पुढे आल्याचे उपनिरीक्षक अभिजित इंगळे यांनी सांगितले. गुन्ह्याच्या तपासात संशयित अभिषेक सपाटे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडून कळे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल मिळाली. त्याला कळे पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अभिजित इंगळे यांनी सांगितले.
सापळ्यासाठी वेशांतराचा आधार
पोलिसांनी मोटारसायकल चोरीला जाणारी ठिकाणे, वेळा निश्चित केल्या. त्याठिकाणी रिक्षाचालक, पानटपरी, हातगाडीवाला असे वेशांतर करून वॉच ठेवला. दोन दिवसांपूर्वी क्रमांक पाटी नसलेल्या मोटारसायकलवरून दोघे जण अंबाई टँक परिसरात आले. येथे पार्किंग केलेल्या मोटारसायकल ते न्याहाळत आणि हँन्डेल तपासू लागले. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघा संशयितांनी त्याची नावे अलंकार पाटील आणि अमर खामकर असल्याचे सांगितले. तपासात त्याच्याकडील मोटारसायकल चोरीची असल्याचे पुढे आल्याने त्या दोघांना अटक केली. पोलिस कोठडीत त्या दोघांनी शहर परिसरातून आणखी मोटारसायकल चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.
कामावर एका, तर येताना दोन मोटारसायकलीवरून
ंसंशयित अलंकार एका कंपनीत, तर अमर एका लॅबमध्ये काम करतो. कामावर जाताना दोघे एका मोटारसायकलवरून जात होते; मात्र घरी परत जाताना एक मोटारसायकल चोरून घेऊन जायचे. त्याचे किमती स्पेअर पार्ट काढून त्याची विक्री करायचे, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे येत आहे. त्याची खातरजमा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२४ गुन्ह्यांची उकल
तपासात संशयितांकडून जुना राजवाडा पोलिस ठाण्याकडील १०, लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरीकडील प्रत्येकी पाच आणि गांधीनगर, कळे पोलिस ठाण्याकडील प्रत्येकी एक असे गुन्हे उघड झाले आहेत. अन्य तीन मोटारसायकल कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्या, याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२० हजारांचे बक्षीस
तपास पथकाला शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी प्रत्येकी दहा हजार असे एकूण २० हजारांचे रोख बक्षीस दिले.
तपासाचे शिलेदार...
ही कारवाई पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे, उपनिरीक्षक अभिजित इंगळे, संदीप जाधव, अंमलदार परशुराम गुजरे, प्रशांत घोलप, सागर डोंगरे, संदीप माने, सतीश बांबरे, प्रीतम मिठारी, अमर पाटील, संदीप पाटील, योगेश गोसावी, संदीप बेंद्रे, गौरव शिंदे, नितीश कुराडे, तुषार भोसले, उत्तम गुरव, नाकील यांनी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69059 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..