
मणेरी रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करा
30152
मणेरी ः बाजारपेठ ते कुबलवाडी दरम्यानच्या रस्त्याची व बाजूपट्टीची झालेली दुरवस्था.
30083
दोडामार्ग ः येथील बांधकाम विभाग कर्मचाऱ्याकडे निवेदन देताना ग्रामस्थ.
मणेरीतील रस्त्याची दुरवस्था
शिवसेनेने वेधले लक्ष; दुरुस्तीसाठी बांधकाम विभागास निवेदन
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १८ ः बांदा-दोडामार्ग मार्गावरील मणेरी बाजारपेठ ते कुबलवाडी दरम्यानच्या रस्त्याला एमएनजीएलच्या पाईपलाईनमुळे भेगा पडल्या आहेत. बाजूपट्टी खचली असून, त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी युवासेनेचे तालुका समन्वयक भगवान गवस, मणेरी उपसरपंच सुधीर नाईक, शिवसेनेचे मणेरी उपविभागप्रमुख शिवराम मोर्लेकर, शिवसेनेचे तालुका कार्यालय प्रमुख गुरुदास सावंत आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दोडामार्ग-बांदा, दोडामार्ग-आयी या रस्त्यांची बाजूपट्टी मजबूत करण्यासाठी आपणाकडे संबंधित कंपनीने रक्कम भरल्याची माहिती कंपनीच्या ठेकेदाराकडून देण्यात आली आहे. त्यामुळे बाजूपट्टी मजबूत बनवून रस्ता निर्धोक बनविण्याची आणि अपघात टाळण्याची जबाबदारी आपली होती. ती आपण पार पाडलेली नाही. त्यामुळे अपघात होऊन जीवित वा वित्तहानी झाल्यास आपणही कंपनी इतकेच जबाबदार असाल. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय आणि अपघात टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात; अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास संबंधित कंपनी आणि सार्वजानिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून जनआंदोलन उभारले जाईल. त्याची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69070 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..