
रत्नागिरी- सायली कर्लेकरला पुरस्कार
-rat18p6.jpg
30077
ः सायली कर्लेकर
-----------------
खो-खोपटू सायली कर्लेकरला
राणी लक्ष्मीबाई पुरस्कार जाहीर
रत्नागिरी, ता. १८ ः रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार रत्नागिरीतील खो-खोपटू सायली दिलीप कर्लेकर हिला जाहीर झाला आहे. तिने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक खो-खो स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश मिळवले आहे. संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी पुरस्काराची घोषणा केली. आज राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मृतीदिनी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
सायली कर्लेकर हिची रा. भा. शिर्के प्रशालेत आठवीत शिकताना राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. हिमाचल ऊना येथे झालेल्या खो-खो राष्ट्रीय स्पर्धेत तिने यश प्राप्त केले. तिने या खेळाची सुरवात पाचवीपासून केली. या खेळाचा सराव छत्रपती शिवाजी स्टेडियमवर नियमितपणे करते. शाळेचे क्रीडाशिक्षक विनोद मयेकर, राष्ट्रीय खो-खोपटू पंकज चवंडे हे तिचे मार्गदर्शक, प्रशिक्षक आहेत. गेल्या चार वर्षांपासून सायली कर्लेकर खो-खो हा खेळ शिकत आहेत. या कालावधीत तिने अनेक जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शालेय ते कनिष्ठ महाविद्यालयीन राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीला गेली ५ वर्षे राणी लक्ष्मीबाई पुरस्कार कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे दिला जात आहे. या पुरस्कार वितरणाची तारीख वेळ लवकरच कळवण्यात येईल, असे माधव हिर्लेकर यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69085 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..