चिपळूण - अरूंद गटारांमुळे तुंबतात शहरातील गटार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - अरूंद गटारांमुळे तुंबतात शहरातील गटार
चिपळूण - अरूंद गटारांमुळे तुंबतात शहरातील गटार

चिपळूण - अरूंद गटारांमुळे तुंबतात शहरातील गटार

sakal_logo
By

-rat18p10.jpg
30072
-ः चिपळूण ः शहरातील अनेक गटारे अरुंद असल्यामुळे ती स्वच्छ करताना सफाई कामगारांना अडचणी येत आहे.
---------
गटारांत तुंबतोय कचरा; पाण्याचा कसा होणार निचरा?

अतिवृष्टीवेळी येणार अडचण; शहरातील बरीच गटारे बंदिस्त
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः शहरातील अनेक नाल्यांची रुंदी कमी झाली आहे, तर काही नाले समुद्रसपाटीपासून उंच बांधण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. पावसाळ्यात ही मोठी समस्या नागरिकांची डोकेदुखी ठरणार आहे.
अतिवृष्टीच्या काळात निर्माण होणाऱ्या संभाव्य पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी चिपळूण पालिकेकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील नाले, पऱ्हे आणि गटारांची स्वच्छता केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी पालिकेने हा कार्यक्रम हाती घेतला. सुरवातीला उपनगरातील नाले, पऱ्हे आणि गटारे स्वच्छ करण्यात आली. आता अंतर्गत भागातील नाले, गटारे स्वच्छ केली जात आहेत. अनेक नाले अरुंद आहेत. त्यांची जेसीबीने स्वच्छता करणे शक्य नाही. त्यामुळे सफाई कामगारांच्या मदतीने नाले, गटार स्वच्छ केले जात आहेत. फावडे, घमेला आणि इतर साहित्य घेऊन पालिकेचे सफाई कामगार गटार, नाले स्वच्छ करत आहेत; मात्र गटारातील घाण उपसताना येणाऱ्या दुर्गंधीमुळे सफाई कामगारांच्या कामावरही मर्यादा येत आहे. पालिकेचे सफाई कामगार नाइलाजाने हे काम करत आहेत. पालिका कर्मचाऱ्यांनी नाल्यांची सफाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या नाल्यातील पाणी खेळते राहत नाही. त्याशिवाय एकाच ठिकाणी जमा होताना दिसत आहे. त्याला पालिकेच्या नाल्यांची उंची कारणीभूत असल्याचे पालिका कर्मचारी सांगत आहेत. येणारा मार्ग उंच आणि ज्या दिशेने सांडपाणी वाहते, तो भाग खाली असायला पाहिजे; मात्र शहरात अनेक ठिकाणी पाणी वाहण्याच्या दिशेने गटारे उंच बांधण्यात आली आहेत. त्यामुळे पाण्याचा पुढे निचरा होत आहे. याच कारणामुळे पावसाळ्यात गटारातील पाण्याचा निचरा होत नाही आणि सतत दहा मिनिटे पाऊस झाला तरी पाणी भरते. गटारे बांधताना झालेली ही मोठी चूक आता महापुराच्या समस्येला कारणीभूत ठरत आहे.
---------------
चौकट
गटारे स्वच्छतेवेळी येतात अडचणी
गटारांच्या पात्रातील उंचीचा प्रश्न कायम असतानाच बंदिस्त गटारे स्वच्छ करताना सफाई कामगारांना अडचणी येत आहेत. शहरातील अनेक गटारे काँक्रीट टाकून बंदिस्त करण्यात आली आहेत. त्यात प्लास्टिक किंवा अन्य साहित्य अडकले तर गटार स्वच्छ कसे करायचे, हा पालिका कर्मचाऱ्यांसमोर प्रश्न आहे.
---------------
कोट
शहरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही तर घरात पाणी जाणार आहे. त्यामुळे गटारे स्वच्छ होणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांनी घरचे ड्रेनेजही गटारात सोडले आहे. पावसाळ्यात गटारांचे पाणी घरात गेले तर डेंगी, मलेरियाची साथ होण्याचा धोका आहे. त्यामुळे गटारे स्वच्छ होणे गरजेचे आहे.
- आसिफ हमजुले, चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69117 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top