गणित प्रज्ञा शिष्यवृत्तीत आरपीडी स्कूलचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणित प्रज्ञा शिष्यवृत्तीत आरपीडी स्कूलचे यश
गणित प्रज्ञा शिष्यवृत्तीत आरपीडी स्कूलचे यश

गणित प्रज्ञा शिष्यवृत्तीत आरपीडी स्कूलचे यश

sakal_logo
By

30113
पारस दळवी, तन्वी दळवी

गणित प्रज्ञा शिष्यवृत्तीत
आरपीडी स्कूलचे यश
सावंतवाडी, ता. १८ ः गणित प्रज्ञा शिष्यवृत्ती परीक्षेत येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र पात्र विद्यार्थी म्हणून सन्मान मिळाला आहे.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ यांच्यावतीने दरवर्षी पाचवी व आठवीसाठी गणित प्राविण्य परीक्षा आयोजित केली जाते. तसेच यातील यशस्वी विद्यार्थ्यांना अंतिम टप्प्यात म्हणजे प्रज्ञा परीक्षेसाठी संधी मिळते. यावर्षी राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेप्रमाणेच गणित प्राविण्य परीक्षेमध्ये आणि आता प्रज्ञा परीक्षेत यश संपादन केले आहे. पाचवीतून तन्वी दळवी व नववीतून पारस दळवी या दोघांना प्रमाणपत्रपात्र विद्यार्थी म्हणून सन्मान मिळाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69119 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top