मालवणात 21 ला योग दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात 21 ला योग दिन
मालवणात 21 ला योग दिन

मालवणात 21 ला योग दिन

sakal_logo
By

मालवण येथे
२१ला योगदिन
मालवण, ता. १८ ः एनएसएस विभाग स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय व ५८ महाराष्ट्र बटालियन व एनसीसीच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी सकाळी सातला आयोजित करण्यात आला आहे.
मालवण पंचक्रोशीतील सर्व नागरिक, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, तसेच अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमात योगासने करण्यासाठी मालवण धक्का येथील नवीन बंदर जेटीच्या ठिकाणी सकाळी पावणेसातला उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर व प्राचार्या उज्ज्वला सामंत आणि एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, एनएसएस ऑफिसर प्रा. शंकर खोबरे यांनी केले आहे. यासाठी शक्यतो पांढरा टी शर्ट आणि सैल पँट असा पोशाख असावा. नसल्यास इतर रंगाचा व्यायाम करता येण्याजोगा पोशाख चालू शकेल. हा कार्यक्रम ४५ मिनिटांचा असेल. संपूर्ण कार्यक्रम मिलिटरीच्या नियोजनानुसार होणार असल्याची माहिती प्राचार्या सामंत, प्रा. खोत यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69135 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top