
संक्षिप्त
खेड तालुक्यात दोन कोरोना बाधित!
खेड ः तालुक्यात सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा शुक्रवारी (ता. १७) कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाच्या बाबतीत हलगर्जीपणा न करता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. खेड तालुक्यात जानेवारी महिन्यात शेवटचे कोरोना बाधित आढळून आले होते. त्यानंतर बाधित आढळून आले नव्हते; मात्र गेल्या दोन दिवसांत कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या काही रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी दोघांचे अहवाल शुक्रवारी बाधित ले आहेत. गतवर्षीपासून तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव दिसला नाही. प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला होता. दैनंदिन हालचालीवरील निर्बंध उठवले होते. सद्यःस्थितीत मास्कचीदेखील सक्ती ठेवलेली नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी जसे व्यवहार होते, त्याप्रमाणे कामकाज सुरळीत सुरू आहे. सर्व प्रकारचे व्यवहार रुळावर येत असताना गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुणे या महानगरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असलेली दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रशासनाने संशयास्पद रुग्णांची खबरदारी म्हणून पुन्हा एकदा कोरोना चाचणी घेण्यास सुरवात केली आहे.
---
---
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69169 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..