
कायमस्वरुपी वायरमनसाठी मनसेचे महावितरणला निवेदन
30159
सावंतवाडी ः उपविभागीय अभियंता भुरे यांना निवेदन देताना मनसेचे पदाधिकारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
डिंगणे, गाळेल, डोंगरपालला
वायरमन गरजेचा ः मनसे
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १८ ः डिंगणे, गाळेल, डोंगरपाल येथे वायरमन नसल्याने येथील ग्रामस्थांना विजेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत बांदा येथील कनिष्ठ अभियंत्यांकडे वारंवार तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी खंत मनसे बांदा विभागीय अध्यक्ष अंकुश उर्फ नाना सावंत यांनी व्यक्त केली. या भागात कायमस्वरुपी वायरमनची नेमणूक करावी, यासाठी मनसेचे डिंगणे पंच सदस्य आदेश सावंत व ग्रामस्थांच्यावतीने सावंतवाडी उपविभागीय अभियंता श्री. भुरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वायरमनची नेमणूक लवकर करण्यात येईल, अशी ग्वाही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. सावंतवाडी शहराध्यक्ष अशिष सुभेदार, बांदा शहराध्यक्ष बाळा बहिरे, संतोष भैरवकर, उपाध्यक्ष शुभम सावंत, तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर, शाखाध्यक्ष नीलेश मुळीक, सुरेंद्र कोठावळे, महाराष्ट्र सैनिक बाबू राऊळ, मनोज कांबळी आदी उपस्थित होते. दरम्यान, आठ दिवसांत यावर तोडगा न काढल्यास मनसेच्यावतीने वीज कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी सावंत यांनी दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69182 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..