
पान एक-मालवण खाडीपात्रात पर्यटकाचा बुडून मृत्यू
मालवण खाडीपात्रात
पर्यटकाचा बुडून मृत्यू
मालवण, ता. १८ ः ठाणे-मुंबई येथून पर्यटनासाठी आलेल्या एकाचा येथील मसुरे-टोकळवाडी जेटीनजीक बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. देवेंद्र जनार्दन जाधव (वय ४०) असे त्यांचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः ठाणे-मुंबई येथून पर्यटनासाठी आलेल्या पाच तरुणांचा गट खाडीपात्रात उतरला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने जाधव बुडाले. रात्री उशिरा खाडीपात्रात स्थानिक ग्रामस्थांनी राबविलेल्या शोधमोहिमेत त्यांचा मृतदेह आढळून आला. मसुरे मार्गाचीतड येथील एका फार्महाऊसवर पाच जणांचा गट पर्यटनासाठी आला होता. ते सर्वजण सायंकाळी पाण्यात पोहण्यासाठी खाडीपात्रात उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सर्वजण पाण्यात बुडू लागले. सुदैवाने यातील चार जणांना किनारा गाठण्यात यश आले; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने देवेंद्र पाण्यात बुडून बेपत्ता झाले. बाबा सय्यद, इस्माईल सय्यद, कुणाल हडकर, रोहित नार्वेकर, राजू मुणगेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी शोधमोहीम राबविली. मसुरे आरोग्य केंद्रात रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. मसुरे पोलिस चौकीचे प्रमोद नाईक, विवेक फरांदे तपास करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69217 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..