''तहसील''च्या आवारात ''पाणीच पाणी'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''तहसील''च्या आवारात ''पाणीच पाणी''
''तहसील''च्या आवारात ''पाणीच पाणी''

''तहसील''च्या आवारात ''पाणीच पाणी''

sakal_logo
By

30201
दोडामार्ग ः तहसीलच्या आवारातील रस्त्यात साचलेले पाणी.

‘तहसील’च्या आवारात पाण्याचा डोह

दोडामार्गची स्थिती; रस्त्यात खड्डा पडल्याने गैरसोय

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १८ ः येथील तहसीलच्या आवारातील रस्त्यात खड्डा पडल्याने भरपूर पाणी साचले आहे. त्या पाण्यातून आत जायचे कसे? असा प्रश्न तालुकावासीय विचारत आहेत.
तालुका मुख्यालयात तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, तलाठी कार्यालय, मंडल अधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, सेतू कार्यालय, आधारकार्ड काढून देणारे केंद्र, उपनिबंधक कार्यालय, उपकोषागार कार्यालय अशी विविध कार्यालये आहेत. जमीन खरेदी-विक्री करणारे आणि त्यांच्या गाड्यांची मुख्यालयात सतत वर्दळ असते. शिवाय तहसील, सेतू, तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. वाहनांना आत आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते करण्यात आले असले तरी त्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे काँक्रिट उखडले आहे. त्यातील लोखंडी शिगा उघड्या पडल्या आहेत. खड्ड्यात साचणारे पाणी कामासाठी येणाऱ्या तालुकावासीयांवर उडते आणि त्यांना नामुष्कीला सामोरे जावे लागते. ठेकेदाराचा हमी कालावधी संपला आहे. साहजीकच रस्त्याची दुरुस्ती कोणी करावी, हा प्रश्न आहे. त्यासाठी तहसीलदारांनी पुढाकार घेऊन बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीबाबत पाठपुरावा करण्याची गरज आहे.
................
वर्धापन दिनाचाही विसर?
यावर्षीचा संपूर्ण पावसाळा तोंडावर आहे. येत्या २६ तारखेला तालुक्याचा वर्धापन दिन आहे. तरीही कुणीही तालुका मुख्यालयाच्या किंवा तहसीलच्या आगारातील श्री महादेव मंदिरासमोरील रस्त्याच्या डागडुजी अथवा बांधणीकडे लक्ष दिलेले नाही. त्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69249 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top