
कुंभारमठ येथे दोन गटांत हाणामारी
कुंभारमठ येथे दोन गटांत हाणामारी
मालवण : येथे पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील पर्यटकांच्या दोन गटांत कुंभारमाठ मुख्य रस्त्यावरच राडा झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. या दोन्ही गटातील तरुणांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. उशिरापर्यंत पुढील कार्यवाही सुरू होती. येथील एका हॉटेलमध्ये सायंकाळी नाश्ता करताना या दोन गटात वाद झाला. त्यानंतर एक गट आपल्या मोटारीतून निघाले. यावेळी दुसऱ्या गटाने पुढे गेलेल्या गटाचा मोटारीने पाठलाग केला. त्या मोटारीसमोर आपली मोटार थांबवून एका व्यक्तीला बाहेर काढून बेदम मारहाण केली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या स्थानिकांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. पर्यटकांच्या गाडीचेही नुकसान झाले. ज्या व्यक्तीला मारहाण झाली तो व्यक्ती कोल्हापूर येथील पर्यटकांचा कुडाळ तालुक्यातील नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात याबाबत दोन्ही बाजूने तोंडी स्वरूपात तक्रारी मांडल्या जात होत्या. पोलिस निरीक्षक विजय यादव यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत तक्रारी प्राप्त झाल्यास नियमानुसार दोन्ही बाजूच्या तक्रारी घेऊन गुन्हे दाखल केले जातील, असे स्पष्ट केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69252 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..