संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

देवघरमधील ग्रामस्थ शिवसेनेत
खेड ः तालुक्यातील देवघर- पाचाचा माळ व निवाचीवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मतदार संघात तसेच देवघर गावात कोट्यवधी रुपयांची विकासकामे आमदार योगेश कदम यांच्या प्रयत्नाने झाली. त्यांची विकासकामे करण्याची कार्यशैली पाहून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी आयोजित कार्यक्रमात सांगितले. प्रवेशकर्त्यांमध्ये सचिन मोरे, राजकुमार मोरे, महेंद्र तटकरे, संभाजी मोरे, अथर्व मोरे, गंगाराम जंगम, साहिल जंगम, अनिल मोरे आदींचा समावेश आहे. वॉर्ड क्र. १ मध्ये विमल मोरे, वॉर्ड क्र. २ मध्ये सुरेंद्र मोरे व वॉर्ड क्र. ३ मध्ये राजकुमार मोरे यांची युवाधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
------------
कुंभार समाजाच्या मागण्यांबाबत
तहसीलदारांना निवेदन
खेड ः कुंभार समाजाबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या विरोधी धोरणांसह प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या महिला प्रदेशाध्यक्षा रसिका खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना निवेदन देण्यात आले. श्रीसंत शिरोमणी गोरोबा काका मातीकला बोर्डचे संचालक मंडळ घोषित करून कामकाज त्वरित सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. गेल्या अडीच वर्षापासून महाविकास आघाडी सरकारने एकही सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. सकल कुंभार समाजाच्या मागण्यांबाबत समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्‍यांसमवेत अधिकृतरित्या एकही बैठक झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे कुंभार समाजाच्या न्याय मागण्याच्या विरोधात असून याच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.
------------------
ज्ञानदीम कॉलेजात मार्केटका एकलव्य
खेड ः मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयात नॅशनल सिक्युरिटीज डीपॉझिटरी लिमिटेडच्यावतीने मार्केट का एकलव्य चर्चासत्र झाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी व गुंतवणुकीचे महत्व पटवून देण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमातंर्गत मार्केट का एकलव्य उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थीदशेत गुंतवणूक करण्याचे फायदे विद्यार्थ्यांना पटवून देत चलनवाढ, उत्पन्नाचे स्त्रोत, महागाईचे परिणाम, गुंतवणुकीचे विविध प्रकार तसेच थ्री एस संकल्पना, गुंतवणुकीच्या चक्रवाढीची शक्ती, गुंतवणुकीची अष्टपैलुता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, महाविद्यालयाचे नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा, मुख्याध्यापक भरत मोरे, प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी, प्रा. उमेशकुमार बागल उपस्थित होते.
------------
सुश्रुत तेंडुलकर यांचे यश
रत्नागिरी ः लांजातील सुश्रुत तेंडुलकर याने दिल्लीच्या नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेसतर्फे घेण्यात आलेल्या डीएनबी इन जनरल सर्जरीच्या अंतिम परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवले. ही परीक्षा मे महिन्यात घेण्यात आली होती. सुश्रुतने २०१८ मध्ये एमबीबीएस पदवी तेरणा मेडिकल कॉलेज नेरुळ येथून संपादन केली. तसेच २०१९ मध्ये डीएनबी जनरल सर्जरीला गिरगाव, मुंबईच्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये प्रवेश घेतला. या संस्थेतून तीन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स विशेष प्राविण्याने पूर्ण केला. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया त्याने तज्ञ डॉक्टरांच्या हाताखाली शिकून घेतलेल्या आहेत. सुश्रुतचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल (लांजा) येथे आणि बारावीचे शिक्षण र. ए. सोसायटीच्या अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात झाले आहे.
--------------
मकबूल दिनवारे यांची निवड
दाभोळ ः उटंबर येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू हजरत पीर बावा याकुब सरवरी दर्ग्याच्या अध्यक्षपदी मकबूल दिनवारे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेच्या सचिवपदी झहूर झोंबडकर, सहसचिवपदी अमजाद चाऊस, खजिनदारपदी मज्जीद चोगले, फय्याज बोरकर, सदस्यपदी हमीद कारविणकर, दिलावर खान, बशीर चाऊस, झुबेर दर्वेश यांची निवड करण्यात आली आहे. दिनवारे हे यापूर्वी या दर्ग्याचे सचिव म्हणून काम पाहत होते.
---------------
पृथ्वीराज जाधव प्रथम
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल ९७.७५ टक्के लागला. ९२ टक्के गुण मिळवून पृथ्वीराज जाधवने प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला. प्रतीक माने ९१.४० टक्के मिळवून द्वितीय, तर वैष्णवी वाघमारे हिने ९० टक्के गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक पटकावला. या दहावी बोर्ड परीक्षेला प्रशालेतून १७८ विद्यार्थी बसले होते. यप्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बंधू मयेकर, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, संस्थेचे सचिव व मालगुंड विद्यालयाचे सी‌ईओ विनायक राऊत, कोषाध्यक्ष संदीप कदम आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
-----------
कबनूरकर स्कूलमध्ये गायत्री सावंत प्रथम
साखरपा ः येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मीडियम स्कूलचा शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. सलग चौथ्या वर्षी शाळेने १०० टक्के निकाल देण्याची परंपरा राखली आहे. गायत्री सावंत हिने ९२.४० टक्के गुण मिळवत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला असून, अमर वाजे (९२ टक्के) तर अवधूत चव्हाण (९०.४० टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्था चेअरमन श्रीधर कबनूरकर, मुख्याध्यापिका लिना कबनूरकर आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69342 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top