महापुराला सामोरे जाताना महापुराला सामोरे जाताना कोळकेवाडी धरण व्यवस्थापन दोन ठिकाणी वाजवणार भोंगे - महापुराला सामोरे जाताना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापुराला सामोरे जाताना
महापुराला सामोरे जाताना
कोळकेवाडी धरण व्यवस्थापन दोन ठिकाणी वाजवणार भोंगे - महापुराला सामोरे जाताना
महापुराला सामोरे जाताना महापुराला सामोरे जाताना कोळकेवाडी धरण व्यवस्थापन दोन ठिकाणी वाजवणार भोंगे - महापुराला सामोरे जाताना

महापुराला सामोरे जाताना महापुराला सामोरे जाताना कोळकेवाडी धरण व्यवस्थापन दोन ठिकाणी वाजवणार भोंगे - महापुराला सामोरे जाताना

sakal_logo
By

rat१९p२३.jpg-
30316
चिपळूणः कोळकेवाडी धरण
-----------------

लोगो - महापुराला सामोरे जाताना


कोळकेवाडी धरण व्यवस्थापन दोन ठिकाणी वाजवणार भोंगे
समन्वयातून आपत्तीचा सामना ; गैरसमज, भिती दूर करण्यासाठी उपायोजना
मुझफ्फर खान ; सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ : कोळकेवाडी धरण परिसरात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास खबरदारीचा उपाय म्हणून कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागाकडून दोन ठिकाणी भोंगे वाजवले जाणार आहेत. सातारा सिंचन विभाग, रत्नागिरी जलसंपदा विभाग आणि चिपळूणमधील शासकीय कार्यालय यावर्षी प्रथमच समन्वयाने आपत्तीचा सामना करणार आहेत.
गेल्यावर्षी महापूर आल्यानंतर कोळकेवाडी धरणाबाबत अनेकांमध्ये गैरसमज पसरले होते. तशी वेळ येऊ नये म्हणून रत्नागिरी आणि सातारा पाटबंधारे विभाग आणि रत्नागिरी जिल्हा प्रशासन समन्वयाने काम करणार आहे. कोयना सिंचन मंडळाने कोळकेवाडी धरणासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज केला आहे. आपत्तकालीन परिस्थितीची माहिती संबंधित ग्रामपंचायत यांना लेखी तसेच मोबाईल, दूरध्वनीवरून दिली जाईल. शिरगाव पोलिस ठाणे, तहसीलदार, प्रांताधिकारी, मुख्याधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी दिली जाईल.

चौकट
अशी असेल अधिकाऱ्यांची टीम
आपत्कालीन परिस्थितीमध्ये कार्यकारी अभियंता, पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग चिपळूण हे समन्वय अधिकारी असणार आहेत. कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर हे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहतील. सहनियंत्रक म्हणून उपविभागीय अभियंता कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग अलोरे काम पाहणार आहेत.

चौकट
मदत किंवा माहितीसाठी यांच्याशी संपर्क करा
दीपक गायकवाड- मोबाईल- ७०६६७८५१००,
दीपक हिवरे- ९६२३६६९६११

चौकट
याठिकाणी वाजणार भोंगे
- कोळकेवाडी धरण माथा
- मौजे अलोरे व नागावे गावाचे हद्दीत मंदार कॉलेज जवळ
----------
दृष्टिक्षेपात...
* कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागाचा पूरनियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्यात येणार आहे.
* धरणातील जलपातळीची प्रत्येक तासाला नोंद घेतली जाणार आहे.
* दिवसभरातील पर्जन्यमान नोंदी घेतल्या जाणार आहेत.
-------------
चौकट
वेबसाईटवर असणार दैनंदिन माहिती
कोयना प्रकल्पातून दैनंदिन होणाऱ्या वीज निर्मिती ची माहिती सकाळी ८ वाजता रत्नागिरी व चिपळूण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता फोन करून किंवा एसएमएसद्वारे दिली जाईल. त्यामुळे कोळकेवाडी धरणातून चिपळूणच्या दिशेने किती पाणी सोडले गेले हे स्पष्ट होईल. पावसाळ्यात प्रकल्पाचे किती टप्पे चालू असतात, त्यातून किती वीजनिर्मिती होते, पाण्याचा किती वापर होतो ही माहिती महानिर्मितीच्या वेबसाईटवरही उपलब्ध असणार आहे.
------------
चौकट
अलोरेतील रुग्णालय २४ तास सेवेत
अलोरे येथे कोयना जलसिंचन मंडळाचे रुग्णालय आहे. पावसाळ्यात हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास सज्ज असणार आहे. रुग्णालयात पुरेसे कर्मचारी आणि औषध साठा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
---------
कोट
कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत, मौजे कोळकेवाडी येथे बोलादवाडी नाल्यावर धरण बांधण्यात आले आहे. याची पाणी साठवण क्षमता ०१.२५ टीएमसी एवढी आहे. धरण जलाशयाचा संतुलित जलाशय म्हणून वापर होतो. पावसाळी हंगामामध्ये धरणाचे परिचलन करणे व माहिती प्रसारित करण्याची कार्यवाही प्रमाणित कार्यप्रणालीनुसार केली जाते. धरणाचे रॉडयल गेट (द्वारे) उघडून सांडव्यावरून कधीही पाणी सोडले जात नाही. त्यामुळे पूरपरिस्थितीमध्ये कोळकेवाडी धरणातून पाणी सोडले गेल्याची अफवा पसरवली गेली तर कुणी विश्वास ठेवू नये.
- नितेश पोतदार, कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन मंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69396 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top