दाभोळ-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-संक्षिप्त पट्टा
दाभोळ-संक्षिप्त पट्टा

दाभोळ-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

-rat19p27.jpg
30345
- निगडे : महिला शेतकऱ्यांना बियाणे वाटप करताना डॉ. प्रवीण झगडे.
-------------
शेतकऱ्यांना भात,
भाजीपाला बियाणे वाटप
दाभोळ : दापोली येथील कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे दत्तक खेडे व त्याच्याशेजारील खेडयांमध्ये भात, नाचणी आणि भाजीपाला बियाण्याचे वाटप करण्यात आले. या विभागामार्फत खरीप हंगामात पीक प्रात्यक्षिकांसाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या रत्नागिरी- ८, रत्नागिरी ६, कर्जत २ तसेच भाजीपाला बियाण्यामध्ये कोकण कारली, कोकण घोसाळी, कोकण काकडी, कोकण भेंडी, चिबूड (कोकण मधुर) या बियाण्यांचे गिम्हवणे, निगडे, सडवे, कोळबांद्रे, वाकवली, शिवाजीनगर, इनामपांगारी, उंबर्ले, कळंबणी, मंडणगड तालुक्यातील दहागांव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाण्यांचे वाटप केले. तसेच ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी-८ आणि कर्जत २ हे भात बियाणे दापोली तालुक्यातील उंबर्ले, इनामपांगारी या गावातील निवडक शेतकऱ्यांच्या बांधावर वाटप केले. विभागातील वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामातील वाटप करण्यात आलेल्या बियाण्याची माहिती सांगितली.
---------
देवरुखात उद्या योगाबाबत व्याख्यान
साडवली ः आठव्या जागतिक योग दिनानिमित्त २१ जूनला देवरुखात योगाचे महत्व या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. देवरूख सावरकर चौक येथील हॉटेल पार्वती पॅलेस येथे सकाळी १० वाजता कडवई येथील योगशिक्षिका डॉ. अनुराधा नारकर या योगाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला देवरूखमधील योगशिक्षिका सौ. शिला प्रकाश घस्ते, अभिनेत्री-दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69439 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top