विलवडे क्रमांक 2 मध्ये ''शाळा प्रवेशोत्सव सोहळा'' उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विलवडे क्रमांक 2 मध्ये ''शाळा
प्रवेशोत्सव सोहळा'' उत्साहात
विलवडे क्रमांक 2 मध्ये ''शाळा प्रवेशोत्सव सोहळा'' उत्साहात

विलवडे क्रमांक 2 मध्ये ''शाळा प्रवेशोत्सव सोहळा'' उत्साहात

sakal_logo
By

L३०३६५

- विलवडे ः आबा दळवी व सिता दळवी यांनी शाळेला साऊंड सिस्टिम भेट दिली. सोबत सरपंच रावजी दळवी व गावातील ग्रामस्थ. (छायाचित्र ः निलेश मोरजकर )

विलवडे क्रमांक २ मध्ये ''शाळा
प्रवेशोत्सव सोहळा'' उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ ः जिल्हा परिषद विलवडे शाळा नं. २ (टेंबवाडी) प्रशालेत ''शाळा प्रवेशोत्सव सोहळा'' मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. पहिलीत प्रवेश करण्याऱ्या विद्यार्थ्याचे गुलाबपुष्प व गोड मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.

शाळा पूर्व तयारी'' मेळावा निमित्त विलवडे गावचे सुपुत्र व मुंबई येथील एस.आर.दळवी फाउंडेशन चे व्यवस्थापकीय विश्वस्त रामचंद्र उर्फ आबा दळवी व सिता दळवी यांनी शाळेला साउंड सिस्टिम भेट देण्याचे जाहीर केले होते. नुकतेच शाळेच्या पहिल्या दिवशी सरपंच रावजी दळवी यांच्या हस्ते शाळेला साउंड सिस्टिम सुपूर्द केले. शाळा व्यवस्थापन समिती, पालक, मुख्याध्यापक यांनी दळवी यांचे आभार मानले. माजी उपसभापती कृष्णा सावंत व मान्यवरांच्या उपस्थीतित सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच प्रकाश दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रश्मी सावंत, उपाध्यक्षा प्राजक्ता दळवी, पूर्वा दळवी, सामाजिक कार्यकर्ते सोनू दळवी, साक्षी दळवी, सामजिक कार्यकर्ते सुभाष कानसे, धनश्री सावंत, संजय सावंत, महेंद्र सावंत, सर्व पालक समिती सदस्य, आजी माजी विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेचे छप्पर मोडकळीस आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेऊन तात्पुरत्या स्वरुपात प्लास्टीक वापर करुन दुरुस्त करुन घेतले आहे. दात्यांनी मदत करण्य‍ाचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश काळे यांनी केले तर आभार सचिन शेळके यांनी केले.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69447 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top