
पर्यटनस्थळांबाबत केंद्रिय मंत्र्यांशी चर्चा
L३०४४८
- गोवा ः प्रसाद गावडे यांनी केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेतली
पर्यटनस्थळांबाबत
केंद्रिय मंत्र्यांशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केंद्रिय संरक्षण व पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची त्यांच्या गोवा-रायबंदर येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे, देवस्थाने, पारंपरिक लोककला, कातळशिल्पे यांची जागतिक पातळीवर व्यापक प्रसिद्धी होणे गरजेचे असल्याकडे लक्ष वेधले. तसेच समुद्री पर्यटनासोबत कृषी पर्यटनावर देखील शासनस्तरावर भर देण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी श्री. नाईक यांनी याबाबतीत सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांशी चर्चा करून विशेष मार्केटिंग पॉलिसी अंमलात आणण्याचे आश्वासन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल जंगले उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69595 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..