
''अक्षरोत्सव''मधील विचारधन महत्त्वाचे - उमप
swt२०६.jpg
30483
मुलुंडः ''अक्षरोत्सव'' प्रदर्शन पाहताना कवी सतीश मोघे, चित्रकार किशोर नादावडेकर आदी.
''अक्षरोत्सव''मधील विचारधन महत्त्वाचे
नंदेश उमप ः मुलुंड येथे प्रदर्शनास प्रतिसाद
तळेरे, ता. २० ः ''अक्षरोत्सव''मधील अक्षर आणि विचारधन सर्वार्थाने महत्त्वाचे आहे. ''अक्षरोत्सव'' म्हणजे अनेक व्यक्तींना एकत्र आणून केलेला महोत्सव आहे. या ठेव्याला भविष्यात महत्त्व प्राप्त होईल, असे प्रतिपादन सुप्रसिध्द गायक शाहीर नंदेश उमप यांनी केले. मुलुंड़ येथील फ़ोर्टीस हॉस्पिटलमध्ये आयोजित अक्षरोत्सव प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने, तर श्री. उमप व अर्जुन पुरस्कार विजेती मल्लखांब खेळाडू हिमानी परब यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू मेघाली कोरगावकर- म्हस्कर, आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू सचिन म्हस्कर, प्रसिध्द ध्वनीमुद्रक किट्टू म्याकल, इंटरनॅशनल फुटबॉलपटू जयेश राणे, फ़ोर्टीस हॉस्पिटलचे रक्तपेढी प्रमुख ललित धनतोळे, डॉ. मनजित सिंग अरोरा, वैद्यकीय सेवा प्रमुख डॉ. मनिषा पाठक, वितरण प्रमुख रिन्कू मावनी, कम्युनिटी प्रमुख अविनाश वाघमारे, ''अक्षरोत्सव''चे प्रमुख निकेत पावसकर आदी उपस्थित होते.
प्रदर्शनामध्ये विविध व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रे प्रदर्शित करण्यात आली होती. या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनास कवी सतीश मोघे, माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे, अभिनेते शशिकांत खानविलकर, प्रसिध्द चित्रकार किशोर नादावडेकर, पत्रकार किशोर गावडे, कोकण महोत्सवाचे संयोजक सुजय धुरत, ॲड. सुनील देवकर, अभिनेते शेखर फडके, ''तिमिरातून तेजाकडे''चे प्रमुख सत्यवान रेडकर, सुलेखनकार श्रीकांत गवंडे, उमेश शिंदे, सुधाकर नर, पालवी फाउंडेशनचे गणेश जाधव, दादर पोस्ट कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी बाळा चौकेकर, मंगेश शेट्ये, पत्रकार विनायक सुतार यांच्यासह अनेकांनी भेट देऊन कौतुक केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69597 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..