
संक्षिप्त
- ratchl202.jpg
30455
चिपळूण ः घाणेखुंट जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छताविषयक वस्तूंचे वाटप करताना पदाधिकारी.
-------------------
घाणेखुंटमध्ये नवागतांचे स्वागत
चिपळूण ः ग्रामपंचायत घाणेखुंट, शिवसेना, युवासेना व जय भवानी मित्रमंडळातर्फे जिल्हा परिषद शाळेतील नवोगतांचे स्वागत करण्यात आले. या पदाधिकाऱ्यांनी घाणेखुंट गावातील तिन्ही जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांना जंतुनाशक साबण व हँडवॉशचे वाटप केले. मुख्याध्यापिका बेंदरकर यांनी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. शिक्षक तांबे यांनी मुलांना शैक्षणिक साहित्य देण्याचे आवाहन केले. या वेळी उपसरपंच रवींद्र खांबल, सदस्य सूरज मोगरे, राजू ठसाळे, किरण ठसाळे, अनिकेत काते, शिक्षक खरात गुरुजी, चव्हाण, लोखंडे गुरुजी, ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
------------
-rat20p9.jpg
30462
खेड ः सदाशिव पांचाळ यांचा सत्कार करताना ‘एलटीटी’ स्कूलचे मुख्याध्यापक गुरुनाथ सारंग.
-------------
एलटीटी स्कूलमध्ये बौद्धिक विकास कार्यशाळा
खेड ः शहरातील लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन आणि बौद्धिक विकास कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेत प्रशालेतील ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कणकवलीतील शैक्षणिक सल्लागार सदाशिव पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. मुख्याध्यापक गुरुनाथ सारंग यांच्या हस्ते पांचाळ यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अहमद मुकादम, समन्वयक सबास्टियश जॉय, एल्सी जॉय, वाहीद मुकादम, जयेश गुहागरकर, मजीद खतिब, प्रेमल चिखले यांनी कार्यशाळेसाठी विशेष मेहनत घेतली.
-------------
-rat20p8.jpg
30461
खेड ः जम्मू येथे एमबीएसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करताना अरविंद तोडकरी.
-------------
जम्मूत एमबीएसाठी वेद संसारची निवड
खेड ः भडगाव खोंडे येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिरचा माजी विद्यार्थी वेद संसार याची जम्मूतील आय. आय. एम. (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) येथे एमबीएसाठी निवड झाली आहे. वेदने बारावीच्या वाणिज्य शाखेच्या परीक्षेत शाळेत ९०.६७ टक्के गुण मिळवले होते. तसेच जिल्हास्तरावर बॅडमिंटनसाठी देखील त्याची निवड झाली होती. त्याची जम्मू येथे एमबीएसाठी निवड झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने त्याचा नुकताच संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी व ज्ञानदीप महाविद्यालयाचे चेअरमन दीपक लढ्ढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, नियामक मंडळाचे चेअरमन पेराज जोयसर, विनोद बेंडखळे, भालचंद्र कांबळे यांच्यासह मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
---
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69607 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..