
राजापूर-राजापूर पालिकेचे विश्रामगृह ठरतय शोभेचे बाहुले
-rat20p16.jpg
30490
-राजापूर ः बंदस्थितीत असल्याने शोभेची बाहुली ठरलेली विश्रामगृहाची इमारत.
-----------------
विश्रामगृहातून उत्पन्नवाढ नाहीच, तोटाच अधिक
राजापूर पालिकेचे विश्रामगृह शोभेचे बाहुले; चालविण्यास कोणीच पुढे येईना
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० : उत्पन्न वाढविण्याच्या उद्दशाने शासनाकडून उपलब्ध झालेल्या अनुदानातून बांधलेले येथील नगरपालिकेचे विश्रामगृह गेल्या काही वर्षापासून बंदस्थितीमध्ये आहे. शहराच्या प्रवेशद्वाराच्या येथे बंदस्थितीत असलेली ही इमारत सध्या शोभेची बाहुली ठरली आहे.
‘क‘ वर्गातील नगरपालिकांचे उत्पन्नाचे स्त्रोत फारसे नसून ते मर्यादित असल्याने पालिकेचे उत्पन्नही त्या तुलनेत मर्यादित असते. कमी उत्पन्नामुळे सहाजिकच शहराच्या विकासावर काही मर्यादा पडत असल्याचे चित्र दिसते. अशा पालिकांच्या उत्पन्नामध्ये एकप्रकारे वाढ होण्यासाठी हातभार लागावा, या उद्देशाने शासनाने शंभर टक्के अनुदानातून ‘क‘ वर्गातील पालिकांना अनुदान दिले होते. यामधून येथील पालिकेला शासनाकडून १६ लाख अनुदान मंजूर झाले होते. त्या अनुदानातून मुंबई-गोवा महामार्गावरील जकात नाकानजीक शहराच्या प्रवेशद्वाराच्या येथे पालिकेने आपल्या जागेमध्ये तीन खोल्यांसह हॉटेलची सोय असणारी विश्रामगृहाची १९९९ मध्ये इमारत बांधली आहे. शासनाच्या अनुदानातून बांधण्यात आलेले हे विश्रामगृह ४० हजार रुपये अनामत रक्कम घेवून प्रतिमहा ४ हजार १०० रुपये भाड्याने देण्याचा निर्णय त्यावेळी कौन्सिलने घेतला होता.
..
चौकट
ठेकेदारांच्या या ‘नकार घंटे‘मुळे..
दरम्यान, कौन्सिल या निर्णयाची अंमलबजावणी होताना हे विश्रामगृह चालविण्यासाठी ठेकेदारांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. ठेकेदारांच्या या ‘नकार घंटे‘मुळे सद्यस्थितीमध्ये ही इमारत बंदस्थितीत आहे. इमारत बंदस्थितीत असल्याने त्या इमारतीच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्याचा पालिकेचा मूळ उद्देश सफल होण्याऐवजी उलटपक्षी तोटाच झाला आहे. सध्या ‘क‘ वर्गातील या पालिकेचे उत्पन्न वाढीचे स्त्रोत मर्यादित असल्याने उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y69640 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..